उमवि कुलगुरूपदासाठी १६ जणांच्या मुलाखती पूर्ण जळगावातील ६ जणांचा समावेश: उर्वरीत १७ मुलाखती आज

By Admin | Published: October 16, 2016 09:29 PM2016-10-16T21:29:12+5:302016-10-16T21:29:12+5:30

जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी कुलगुरू शोध समितीतर्फे रविवारी मुंबईत मुलाखतींना प्रारंभ करण्यात आला. एकूण ३३ इच्छुकांपैकी १६ जणांच्या मुलाखती पहिल्या दिवशी घेण्यात आल्या. त्यात जळगाव व उमवि कार्यक्षेत्रातील ११ पैकी ६ जणांचा समावेश होता. उर्वरीत १७ मुलाखती सोमवारी होणार आहेत.

16 interviews for Umval Chalukrupada: 6 people from Jalgaon will be included: remaining 17 interviews today | उमवि कुलगुरूपदासाठी १६ जणांच्या मुलाखती पूर्ण जळगावातील ६ जणांचा समावेश: उर्वरीत १७ मुलाखती आज

उमवि कुलगुरूपदासाठी १६ जणांच्या मुलाखती पूर्ण जळगावातील ६ जणांचा समावेश: उर्वरीत १७ मुलाखती आज

googlenewsNext
गाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी कुलगुरू शोध समितीतर्फे रविवारी मुंबईत मुलाखतींना प्रारंभ करण्यात आला. एकूण ३३ इच्छुकांपैकी १६ जणांच्या मुलाखती पहिल्या दिवशी घेण्यात आल्या. त्यात जळगाव व उमवि कार्यक्षेत्रातील ११ पैकी ६ जणांचा समावेश होता. उर्वरीत १७ मुलाखती सोमवारी होणार आहेत.
आज मुलाखती पार पडलेल्या जळगावच्या इच्छुकांमध्ये उमविच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक प्रा.डी.जी.हुंडीवाले, स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसचे संचालक व बायोकेमिस्ट्री विभाग प्रमुख प्रा.विजय माहेश्वरी, स्कूल ऑफ फिजीकल सायन्सेसचे माजी संचालक प्रदीप पाटील, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख प्रा.दिनेशकुमार गौतम, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसचे संचालक प्रा.प्रमोद माहुलीकर, स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सेसचे संचालक प्रा.भाऊसाहेब पवार यांचा समावेश आहे. मुलाखतीसाठी राज्यभरातून विविध महाविद्यालये, विद्यापीठांमधील विभागप्रमुख, प्राध्यापक आदींचे ३३ अर्ज स्वीकारण्यात आले असून, मुलाखती मुंबई विद्यापीठात घेण्यात येत आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध प्रशाळा, विभागांमधील ११ प्राध्यापक, प्रमुखांचे अर्ज स्वीकारले असून, त्यांनाही मुलाखतीसाठी बोलावणे आले आहे. या मुलाखतीनंतर पाच जणांची अंतिम मुलाखतीसाठी निवड होईल. राज्यपाल या पाच जणांच्या मुलाखती घेतील.

Web Title: 16 interviews for Umval Chalukrupada: 6 people from Jalgaon will be included: remaining 17 interviews today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.