दोन रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित

By Admin | Updated: December 14, 2014 00:06 IST2014-12-14T00:01:58+5:302014-12-14T00:06:08+5:30

उस्मानाबाद : बनावट कार्डधारकांना धान्य वितरीत केल्याप्रकरणी तसेच धान्याची जादा दराने विक्री केल्याबद्दल तालुक्यातील कावलदारा

The suspension of two goods shops official | दोन रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित

दोन रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित


उस्मानाबाद : बनावट कार्डधारकांना धान्य वितरीत केल्याप्रकरणी तसेच धान्याची जादा दराने विक्री केल्याबद्दल तालुक्यातील कावलदारा येथील रास्तभाव दुकानदारास तर, साखर वितरीत न करणे तसेच रेशनकार्डसाठी शंभर रुपये घेतल्याप्रकरणी उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील दुकानदाराचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी घुगे यांनी सांगितले की, समुद्राळ येथील सदर दुकानदाराबाबत तक्रार केली होती. सदर प्रकरणाची चौकशी केली असता, रेशनकार्डसाठी शंभर घेणे, मागील तीन महिन्यात धान्य वितरीत न करणे, धान्याची जादा भावाने विक्री करणे, विक्री केलेल्या धान्याची पावती न देणे, साखर न वितरीत न करण आदी दोष आढळून आले होते. या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावुन खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र खुलासा असमाधानकारक आल्याने तो अमान्य करण्यात आला. कावलदरा येथील रास्त भाव दुकानदाराच्या चौैकशीतही गावातील रहिवाशी नसलेल्या तसेच नौैकरदारांना अंत्योदय योजनेचा लाभ देणे, एकाच कार्डधारकास दोन योजनेचा लाभ देणे, बनावट कार्डधारकांना धान्य वितरीत करणे आदी बाबी आढळून आल्याने वरील दोन्ही दुकानदारांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: The suspension of two goods shops official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.