श्रीक्षेत्र माहूर : विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यातील मानोरा धानोरा गावातील कर्जबाजारी शेतकरी प्रकाश श्यामराव भोयर (वय ५०) यांनी माहूर घाटाखालील पैनगंगा नदीकिनाऱ्यावरील केरोळी शिवारातल्या केळीच्या बागेत विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना २६ रोजी सकाळी ७़१५ वाजता उघडकीस आली़पैनगंगा नदी किनाऱ्यावर दक्षिण दिशेस सै़निजामोद्दीन यांचे शेत सर्वे नं़१६ ब आहे़ शेतात केळीचे पीक आहे़ निजामोद्दीन हे दररोजप्रमाणे सकाळी शेतात गेले़ तेथे अनोळखी इसम मृतावस्थेत दिसला़ त्याच्या हातात विषारी औषधीचा डब्बा दिसल्याने त्यांनी तत्काळ पोलिस पाटील सै़ जमालोद्दीन सै़ अैनोद्दीन यांना दूरध्वनी करून कळविले़ त्यांनी लगेच घटनास्थळाची पाहणी करून माहूरच्या पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली़घटना कळाल्याने पो़ नि़ प्रभाकर रायते यांनी घटनास्थळी जावून मयताच्या खिशातील संपर्कावरून त्यांचे निकटवर्तीयांना दूरध्वनीवरून कळविले़ दोन तासांतच निकटवर्तीय पोहोचले़ त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते़ त्यांनी मुलीच्या लग्नाची चिंताही बोलून दाखविली होती़ (वार्ताहर)
विदर्भातील शेतकऱ्याची माहूरमध्ये आत्महत्या
By admin | Updated: February 27, 2016 00:01 IST