शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जिल्ह्यात पेरण्या खोळंबलेल्याच!

By admin | Updated: July 17, 2014 01:07 IST

जालना : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात जुलैच्या मध्यंतरापर्यंत केवळ १४ टक्केच खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून, आठही तालुक्यातील बहुतांशी पेरण्या पावसाअभावी पूर्णत: खोळंबल्या आहेत.

जालना : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात जुलैच्या मध्यंतरापर्यंत केवळ १४ टक्केच खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून, आठही तालुक्यातील बहुतांशी पेरण्या पावसाअभावी पूर्णत: खोळंबल्या आहेत. दरम्यान, मूग, उडीद या दोन पिकांचे लागवड क्षेत्र लांबलेल्या पावसामुळे कमी होणार आहे. तर ठिबकवर लागवड केलेल्या कापसाची दुबार पेरणी करावी, लागणार असे चित्र आहे.जुलैचा दुसरा आठवडा संपला. तरीही जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला आहे. १४ जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण केवळ ५१. ७३ टक्के एवढेच आहे. त्यात जिल्ह्यात परतूर तालुक्यात ९५.०४, पाठोपाठ जालन्यात ७२.७५ एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. अंबड तालुक्यात ५५.२७, घनसावंगी ५४.५५, भोकरदन ४८.०२, बदनापूर ३०.०२, जाफराबाद २९.०६, तर सर्वात कमी म्हणजे मंठा तालुक्यात २८ मिलीमीटरएवढीच पावसाची नोंद झाली आहे.या संपूर्ण जिल्ह्यात आठही तालुक्यात या अपुऱ्या पावसामुळेच खरिपाच्या पेरण्या पूर्णत: खोळंबल्या आहेत. खरिपाच्या पेरण्यांचे प्रमाण जुलै मध्यतंरापर्यंत १४ टक्के एवढेच आहे. जिल्ह्यात ७८ हजार २५३ हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यापैकी ५२ हजार हेक्टर केवळ कापसाचे आहे. अन्य पिकांची पेरणीच झाली नाही. विशेषत: मूग व उडीद या पिकांची लागवडच होणार नाही, असे चित्र आहे. यावर्षी खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. गतवर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात शंभर टक्के पेरणी पूर्ण झाली होती. पिकांची स्थितीही समाधानकारक होती. यावर्षी अद्याप पेरणीच न झाल्याने आगामी काळ दुष्काळसदृश स्थितीसारखा राहील, अशी चिन्हे आहेत. यामुळे शेतकरी अक्षरश: हबकून गेला आहे. जिल्ह्यात खरिपाचे तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. त्यापैकी अडीच लाख हेक्टर कापसाचे क्षेत्र आहे. असे असले तरी जिल्ह्यात फक्त १८५ . २१ हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने भोकरदन २२.८८, जाफराबाद- १३.०९, जालना ३७.९४, अंबड ५२, परतूर २२.२७, बदनापूर १२.५२, घनसावंगी ६.२७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ६.७ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे. सोयाबीनची जाफराबाद तालुक्यात .१६ हेक्टरवर तर ०.२ टक्के पेरणी झाली आहे. इतर तालुक्यांत शून्य टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. (प्रतिनिधी)गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाचे प्रमाण २५ टक्केही नाहीयावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्याअखेर फक्त ५१.७३ मिलीमीटर पावासची नोंद झाली आहे. गतवर्षी १४ जुलै अखेर जिल्ह्यात २३३.०४ मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. ही तफावत मोठी भीषण विदारकता स्पष्ट करणारी आहे. या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचा सुद्धा प्रश्न उभा राहील अशी चिन्हे आहेत. सप्टेंंबर २०१४ पर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून होतो आहे. परंतु जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात चाराटंचाईचे संकट उभे राहिले आहे.जिल्ह्यात ३६ गावांना पाणीपुरवठा सुरु आहे. १२८ विहिरींचे प्रशासनाने अधिग्र्रहण केलेले आहे. परंतु ही संख्या या आठ दिवसांत दुपटीने वाढेल, असा अंदाज जिल्हा महसूल प्रशासनाने व्यक्त केला आहे. टंचाईग्रस्त गावांत तात्काळ टँकर सुरु करण्याची शिफारशीही करण्यात आल्या आहेत.तालुकायावर्षीचा पाऊस गेल्यावर्षीचा पाऊसजालना७२.७५२९७.८२भोकरदन४८.०२२३२.७९जाफराबाद२९.०६३१२. २बदनापूर३०.२१८३परतूर९५.४२७८.४अंबड५५.२७२०२.३९घनसावंगी५४.५५१३०.७४मंठा२८ २२७.२५एकूण५१.७३३३३.०४