महसूल, पोलिसांचा वाळू तस्करीस आशीर्वाद
By Admin | Updated: May 29, 2014 00:39 IST2014-05-28T23:56:43+5:302014-05-29T00:39:57+5:30
रवी गात , अंबड तालुक्यात सर्वदूर अवैध वाळू उपसा व वाहतुकीने कहर केला आहे. महसूल, पोलिस व राजकीय आशीर्वादामुळे वाळू तस्कारांची दादागिरी वाढली आहे.

महसूल, पोलिसांचा वाळू तस्करीस आशीर्वाद
रवी गात , अंबड तालुक्यात सर्वदूर अवैध वाळू उपसा व वाहतुकीने कहर केला आहे. महसूल, पोलिस व राजकीय आशीर्वादामुळे वाळू तस्कारांची दादागिरी वाढली आहे. नदी पात्रांची चाळणी झाली आहे. पर्यावरण विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. वाळू तस्कर प्रामुख्याने गोंदी, शहागड, वडीगोद्री, पाचोड, औरंगाबाद. शहागड, सुखापुरी फाटा, सोनक पिंपळगाव, वडीलासुरा, पाचोड, औरंगाबाद. शहागड, सुखापुरी फाटा, अंबड, मार्डी, किनगाव चौफुली, रोहिलागड, औरंगाबाद. शहागड, सुखापुरी फाटा, अंबड, मार्डी, किनगांव चौफुली, जामखेड, औरंगाबाद. शहागड, सुखापुरी फाटा, अंबड, पारनेर फाटा, औरंगाबाद, तीर्थपुरी, झिरपी फाटा, सुखापुरी फाटा, औरंगाबाद. शहागड, अंबड टाकळी, पैठण, औरंगाबाद इ. मार्गांनी आपली अवैध वाळू वाहतूक होते. महसूल व पोलिस प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकार्यांच्या संगनमताने ही वाळू तस्करी सुरु आहे. वाळू तस्करीमुळे केवळ तस्करच नव्हे तर महसूल व पोलिस प्रशासनातील अनेक अधिकारीही गब्बर झाले आहेत. राजकीय नेते, महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, वाळू माफिया यांची एक साखळीच कार्यरत आहे. ही साखळी मोडून वाळू तस्करी थांबविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीमुळे गोदापात्राचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरणाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. याबरोबरच वाळू तस्करांची अवजड वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करत असल्याने तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. खड्डयांमुळे अनेक अपघातही घडले आहे. मागील आठवडयात शहागड-पैठण रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची धडक होऊन तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाने वाळू तस्करीच्या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहण्यास सुरुवात केलेली नाही. जिल्हाधिकारी ए.एस.रंगा नायक व पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी याप्रकरणी विशेष लक्ष देऊन वाळू तस्करांविरोधात विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्वत: वाळु तस्करीच्या विरोधात मोहीम राबविली तरच या वाळु तस्करांना आळा बसु शकतो, अन्यथा येणार्या काही वर्षात गोदापात्रात वाळु ऐवजी केवळ माती पाहण्याची वेळ आपल्यावर येईल एवढे मात्र निश्चित. (समाप्त) नदीपात्रातून सततच्या वाळू उपशाचा परिणाम पाणी पातळीवर होत आहे. परिसरातील विहिरी तसेच कूपनलिकांच्या पाणी पातळीची झपाट्याने घट होत आहे. वाळू उपशामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे अतोनात नुकसान होत आहे. या प्रकाराकडे पर्यावरण विभागाचेही दुर्लक्ष होत आहे.