परतुरात डॉक्टरवर हल्ला
By Admin | Updated: May 7, 2015 00:56 IST2015-05-07T00:46:01+5:302015-05-07T00:56:44+5:30
परतूर: तीन अज्ञात हल्लेखोरांनी शहरातील एका डॉक्टरवर स्टंपने हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

परतुरात डॉक्टरवर हल्ला
परतूर: तीन अज्ञात हल्लेखोरांनी शहरातील एका डॉक्टरवर स्टंपने हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील मोंढा भागातील डॉ. राजगोपाल तापडिया हे ५ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आपले हॉस्पीटल बंद करीत असताना अचानक तीन हल्लेखोर मोटार सायकलवर तोंडाला कापड बांधून आले. त्यांनी डॉ. तापडिया यांच्यावर स्टंपने हल्ला केला. या हल्ल्याने तापडिया यांनी जोरजोरात आरोळी दिली. त्यामुळे आरोपींनी पळ काढला यावेळी विशेष म्हणजे शहरातील वीज गुल झालेली होती. अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले. डॉ. तापडिया यांच्या गुडघ्यावर जबर मार लागला. तसेच हात व छातीवरही मुका मार लागला.
ही घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत आरोपी म्हणून डॉ. तापडिया यांचे बंधू गोविंद तापडिया यांचे नाव दिले आहे. तपास पो. कॉ. दुसाने हे करीत आहेत.