सुर्वणपदकाचे वितरण
याच कार्यक्रमात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुर्वणपदकांचे (गुणवत्तापदक) वितरण करण्यात येणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेतील गुणवंतांना २५ सुर्वणपदकांचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये मारुती खरात (कुलपतींचे सुवर्णपदक, लक्ष्मीबाई जाधव सुवर्णपदक, एम.ए. मराठी), मयुरी निकम, प्रगती कोरडे (एम.ए. इंग्रजी), अनिता रायमल (बी.ए. इंग्रजी), ऐश्वर्या टाक (बी.जे.), आरती घुगरे (बी.एस्सी.), अजित वावरे (एम.एस्सी. रसायनशास्त्र), सुमेध चव्हाण (एम.एस्सी. वनस्पतीशास्त्र), मनोहर मस्के (संख्याशास्त्र), ज्ञानेश्वर तोंडे (गणित), भैयासाहेब गायकवाड (संगणकशास्त्र), शिवकन्या आवाड (जीव-रसायनशास्त्र), प्रतीक डाके (एम.बी.ए.), रिद्धेश काथार (बी.ई. मेकॅनिकल), अक्षिता मुसांडे (बी.ई. केमिकल), स्मिता रातवाणी (बी.कॉम.), अखिल फादल अली (एम.कॉम.), आदित्य शिंदे (एलएल.एम.), मेराज फातेमा (बी.एड.), धनश्री वरकड (बी.एड.) व रामशा इफ्त सय्यद कलिमोद्दीन (बी.एड.) आदींचा समावेश आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.