विजेचा लंपडाव, लाडसावंगीकर आले जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:06 IST2021-03-10T04:06:07+5:302021-03-10T04:06:07+5:30

फिटर योजनेमुळे वीज ग्राहकांसह लाइनमन वैतागले आहेत. त्यामुळे चाेवीस तास सिंगल फेज योजनेला हरताळ फासली गेली आहे. लाडसावंगी गावाला ...

Power outage | विजेचा लंपडाव, लाडसावंगीकर आले जेरीस

विजेचा लंपडाव, लाडसावंगीकर आले जेरीस

फिटर

योजनेमुळे वीज ग्राहकांसह लाइनमन वैतागले आहेत. त्यामुळे चाेवीस तास सिंगल फेज योजनेला हरताळ फासली गेली आहे.

लाडसावंगी गावाला व लघु उद्योगासाठी चोवीस तास वीज मिळावी म्हणून व शेतीचा वीज पुरवठा सुरळीत चालावा, यासाठी महावितरण कंपनीने गावठाण फिटर योजनेत लाडसावंगी गावाचा समावेश केला. ज्यामुळे गावाची वीज व शेतीचा वीज पुरवठा वेगवेगळा केला जाणार आहे. त्यासाठी गावात पंधरा नवीन रोहीत्र बसविण्यात येत आहेत. नवीन रोहीत्र बसविताना एक फेज सतत सुरू राहावा, अशा सूचना कंत्राटदाराला देण्यात आल्या होत्या; परंतु गावठाण फिटरच्या अर्धवट कामांमुळे सातत्याने बिघाड होत असल्याने शेतावरील व गावात कायम विजेचा लंपडाव सुरू झाला आहे. साधा फ्यूज जरी कटला तरीदेखील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाइनमनची कसरत सुरू झाली आहे. त्यामुळे तेदेखील या कामाला वैतागले आहेत. वरिष्ठांनी दखल घेऊन गावठाण फिटर योजनेचे अर्धवट काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: Power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.