आता नजरा रविवारकडे

By Admin | Updated: October 17, 2014 00:28 IST2014-10-17T00:08:34+5:302014-10-17T00:28:11+5:30

बीड : जिल्हयातील सहा विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकांचे मतदान बुधवारी शांततेत पार पडले. रविवारी मतमोजणी होत आहे. मतमोजणीची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे.

Now look Sunday | आता नजरा रविवारकडे

आता नजरा रविवारकडे


बीड : जिल्हयातील सहा विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकांचे मतदान बुधवारी शांततेत पार पडले. रविवारी मतमोजणी होत आहे. मतमोजणीची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. याकामासाठी अडीच हजार कर्मचारी तर दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले असल्याची माहिती निवडणुक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी पुवीच्या निवडणुकांची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ठिकाणी होत होती़ मात्र यावेळी प्रशासनाने मतमोजणीची जागा बदललेली असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मतमोजणी होत आहे़
बुधवारी जिल्हयातील सहा विधानसभा मतदार संघ व लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले़ रविवारी ता़ १९ आॅक्टोंबर रोजी मतमोजणी होत आहे़ यावेळी पहिल्यांदाच शासनाने मतमोजणीची जागा बदलेली आहे़ यापुर्वी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ठिकाणी होत असते, परंतु जिल्हयातील सहा विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुक एकत्रीत आल्याने मतमोजणीच्या जागा बदलाचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला़
मतदार संघ निहाय खोलीची व्यवस्था
कृषी उत्पन्न बाजार समितीचे गोदाम निवडणुक विभागाने मतमोजणीसाठी ताब्यात घेतले आहेत़ जिल्हयातील सहा विधानसभा मतदार संघासाठी वेगवेगळ्या खोल्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे़ याशिवाय कुर्ला मार्ग बंद रहाणार आहे़ यामुळे कृउबा परिसरात खाजगी वाहनाला प्रवेश बंद रहाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़
मोंढा राहणार बंद
रविवारी मतमोजणी निमित्त मार्केट यार्ड व कुर्ला रोड सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आलेला आहे़ त्यामुळे या दिवशी शेतकऱ्यांनी बाजार समितीत माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन सचिव आऱ पी़ बहीर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे़ (प्रतिनिधी)
जिल्हयातील सहा विधानसभा मतदार संघ व लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी बीड येथे एका कृउबा समितीच्या परिसरात होत आहे़
४एका विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी विविध विभागातील ३६० कर्मचारी रहाणार आहेत़
४एका मतदार संघात विधासभेसाठी दहा व लोकसभेसाठी दहा असे एकूण वीस टेबल वरून मतमोजणीचे काम चालणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले़
४सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे़
४लोकसभा व विधानसभेची मतमोजणी एकाच वेळी होणार आहे़
४दुपारी ४ वाजेपर्यंत निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट होईल असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला़

Web Title: Now look Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.