कांबळे यांची बदली; ५ सहायक बीडीओ रुजू
By Admin | Updated: June 3, 2014 00:42 IST2014-06-03T00:39:22+5:302014-06-03T00:42:34+5:30
जालना : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन कांबळे यांची पुणे येथे निरंतर प्रौढ केंद्रात सहायक संचालक या पदावर बदली झाली

कांबळे यांची बदली; ५ सहायक बीडीओ रुजू
जालना : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन कांबळे यांची पुणे येथे निरंतर प्रौढ केंद्रात सहायक संचालक या पदावर बदली झाली असून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात नव्यानेच निर्मित झालेल्या सहायक गटविकास अधिकारीपदी पाच जण रुजू झाले आहेत. शिक्षणाधिकारी कांबळे यांचा मागील काही कार्यकाळ वादग्रस्त ठरल्याने मध्यंतरी त्यांना जि.प. सदस्यांच्या ठरावानुसार सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. तर त्यानंतर रूजू होऊन काही दिवसांपूर्वी कांबळे हे रजा न देताच गैरहजर होते. त्यामुळे त्यांची बदली होणार, अशी चर्चा गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारी ही पदनिर्मिती झाली असून त्यामध्ये व्ही.आर. लाड (जालना पंचायत समिती), ए.बी. सिरसाठ (मंठा), पी.एन. कुस्रेनिवार (घनसावंगी), ए.एस. हारदे (अंबड), डी.के. पांडव (भोकरदन) हे रूजू झाले आहेत. पंचायत समित्यांमध्ये पूर्वीपेक्षा आता कामांची संख्या वाढल्याने गटविकास अधिकार्यांना सहायक अधिकारी आवश्यक होते. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सहायक गटविकास अधिकार्यांची पदे निर्माण झाली. (प्रतिनिधी) जिल्ह्यात दोन गटविकास अधिकारी रूजू झाले असून त्यामध्ये अरूण चाऊलवार हे सोयगाव येथून बदलून जाफराबाद येथे रूजू झाले आहेत. तर अंबड येथील बालविकास प्रकल्प अधिकारी बी.बी. कुलकर्णी यांची पदोन्नती होऊन गटविकास अधिकारी म्हणून ते बदनापूर येथे रुजू झाले आहेत.