ग्रामसेवकांनो, रुजू व्हा अन्यथा सेवासमाप्ती!

By Admin | Updated: July 11, 2014 00:58 IST2014-07-10T23:41:30+5:302014-07-11T00:58:21+5:30

बीड : जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे़ सहभागी ग्रामसेवकांना सात दिवसांत हजर व्हा अन्यथा सेवासमाप्तीची तंबी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नईमोद्दीन कुरेशी यांनी दिली़

Gramsevats, join us, otherwise the service is finished! | ग्रामसेवकांनो, रुजू व्हा अन्यथा सेवासमाप्ती!

ग्रामसेवकांनो, रुजू व्हा अन्यथा सेवासमाप्ती!

बीड :विविध मागण्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे़ आंदोलनात सहभागी ग्रामसेवकांना सात दिवसांत हजर व्हा अन्यथा सेवासमाप्तीची तंबी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नईमोद्दीन कुरेशी यांनी दिली़ गुरुवारी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांनी अहवालही मागविला आहे़
३० जून २०१४ पासून जिल्ह्यातील ६६७ ग्रामसेवक कामबंद आंदोलनात सहभागी आहेत़ ग्रामसेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्या मंजूर होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या चाव्या व रेकॉर्ड गटविकास अधिकाऱ्यांना सोपवून आंदोलनाची तीव्रता वाढवली होती़ दरम्यान, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडून आठ मुद्द्यांत माहिती मागविली आहे़ आंदोलनात सहभागी ग्रामसेवकांना नोटीस बजावून रुजू होण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे़ अन्यथा ग्रामसेवकांची सेवासमाप्तीचा इशारा दिला आहे़
आता आरपारची लढाई
ग्रामसेवक ग्रामीण विकासाचा कणा आहे़ शासनाच्या १३७ योजनांची ग्रामसेवकांमार्फत अंमलबजावणी होते़ ग्रामसवेकांच्या मागण्या जुन्याच आहेत;पण त्याकडे शासन गांर्भियाने पहायला तयार नाही़ सेवासमाप्तीची नोटीस पाठविली असली तरी आता माघार नाही, अशी प्रतिक्रिया राज्य ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण बडे यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Gramsevats, join us, otherwise the service is finished!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.