गरज भासल्यास गंगापूर नगरपालिका जम्बो रुग्णालय सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:06 IST2021-03-10T04:06:17+5:302021-03-10T04:06:17+5:30
औरंगाबाद शहरात मोठ्या संख्येने रुग्णवाढ होत असून ही बाब गंगापूर शहरासाठी चिंतेची आहे. ही रुग्णवाढ थोपविण्यासाठी नगरपालिका व ग्रामीण ...

गरज भासल्यास गंगापूर नगरपालिका जम्बो रुग्णालय सुरू करणार
औरंगाबाद शहरात मोठ्या संख्येने रुग्णवाढ होत असून ही बाब गंगापूर शहरासाठी चिंतेची आहे. ही रुग्णवाढ थोपविण्यासाठी नगरपालिका व ग्रामीण रुग्णालय प्रयत्नशील आहे. शहरात कोरोना रुग्णांची वाढ पाहता नगरपालिकेच्या वतीने गरज भासल्यास तात्पुरत्या स्वरूपाचे जम्बो हॉस्पिटल उभारण्यात येईल, असा निर्णय नगरपालिकेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील, बांधकाम सभापती अविनाश पाटील, आरोग्य व स्वच्छता सभापती पल्लवी सिरसाट यांनी कोविड १९ चे नोडल अधिकारी डॉ. सुदाम लगास, डॉ. रमेश पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मारोती खैरे, डॉ. आबासाहेब सिरसाट व शहरातील डॉक्टर असोसिएशनचे सर्व डॉक्टर उपस्थित होते. नगरपालिकेच्या निर्णयाला आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. योगेश गवळी यांनी सांगितले.