महात्मा फुले समता परिषदेचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: July 27, 2015 01:09 IST2015-07-27T00:40:12+5:302015-07-27T01:09:35+5:30
जालना: अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेच्या वतीने जातीनिहाय जनगणना खुली करण्यात यावी, या मागणीसाठी रविवारी मामा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

महात्मा फुले समता परिषदेचे धरणे आंदोलन
जालना: अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेच्या वतीने जातीनिहाय जनगणना खुली करण्यात यावी, या मागणीसाठी रविवारी मामा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा सरकाचा निषेध करण्यात आला.
मागील सरकारने सर्व ओबीस प्रवर्गातील जातीनिहाय जनगणना केली होती. या सरकारनेही ती सुरु करावी, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची आहे.
आंदोलनास जिल्हाध्यक्ष रामभाऊ गाढेकर, डॉ. विशाल धानुरे, प्रचारप्रमुख दशरथ तोेंडूळे, दीपक वैद्य, बापू घायाळ, अॅड. दिनशे दैने, राजू अंभोरे, ज्ञानेश्वर गाढेकर, अशोक वाजे, रामभाऊ वाघमारे, विलास सोनवणे, शिवाजी गाढेकर, मयूर गाढेकर, सुरेश ब्राह्मणे, सुनील घोरफडे, गफार पठाण, अनिल सोनवणे, एकनाथ जाधव, रामेश्वर राजगिरे, उद्धव सोनवणे, प्रकाश सोनवणे, भास्कर गारखेडे, राजेश तोंडूळे, नितीन इंगळे आदींची उपस्थिती होती.
चिखलमय रस्ता
जालना : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या घायाळनगरमध्ये अल्प पाऊस आला तरी रस्त्यावर सर्वत्र चिखल होतो. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मध्यवस्तीतील ही वसाहत गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षितच आहे. संबंधितांनी येथे रस्त्यांची कामे हाती घेवून घायाळनगरवासियांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.