बद्रीनाथ मते, तीर्थपुरीयेथील पावणेतीन कोटी खर्च करून बांधण्यात येत असलेल्या फळ, भाजीपाला शीतगृहाचे काम कासवगतीने सुरू आहे. परिणामी, परिसरातील शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान होत आहे. पणन महामंडळाने पुणे यांनी तीर्थपुरी, घनसावंगी, अंबड येथील शेतकऱ्यांच्या फळबागेचा माल शितगृहात ठेवण्यासाठी एक योजना जाहीर केली. २५ मेट्रीक टन एवढी फळे व भाजीपाला या शीतगृहात साठविता येऊ शकतो. परंतु काही बाबींची पूर्तता न झाल्याने अनेक महिन्यांपासून शीतगृहाचे काम रखडलेले आहे. ठेकेदार आणि पणन महामंडळाच्या वेळकाढूपणामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे शीतगृह तयार आहे, परंतु ठेकेदार आणि पणन यांच्यातील असमन्वयामुळे शीतगृहाचा शेतकऱ्यांना उपयोग घेता येत नाही. यामुळे शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. शीतगृहाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.येथील शीतगृहाचे काम ३ वर्षांपासून सुरू आहे. सपंूर्ण इमारत बांधून पूर्ण झाली आहे. इमारतीत मोठे जनरेटर, विजेची सर्व व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. वीज वितरणासाठी स्वतंत्र रोहित्रही बसविण्यात आले आहे. महिनाभरापूर्वी शीतगृहाची चाचणीही करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.ढिसाळ कारभारामुळे शीतगृहाचा वापर बंद आहे. शेतकऱ्यांना या शीतृहाचा वापर कधी व केव्हा मिळणार, असा सवाल परिसरातील शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.तीन तालुक्यांना होणार फायदाअंबड, घनसावंगी येथील शेतकऱ्यांना या शीतगृहाचा मोठा फायदा होणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचा खराब होणारा भाजीपाला, फळे कित्येक दिवस ताजी राहणार आहेत. घनासावंगी बाजार समितीचे सभापती तात्यासाहेब उढाण म्हणाले की, मार्केट कमिटीने एक एकर जमीन या शीतगृहासाठी दिली. शीतगृहाचा खर्च आणि येणारे उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने ते चालविण्यास घेण्यासाठी मार्केट कमिटी तयार नसल्याने उढाण म्हणाले. खाजगी तत्त्वाचा अवलंबशीतगृह ठेकेदाराकडून लवकरच ताब्यात घेण्यात येईल. हे गृह खाजगी चालकाला चालविण्यास देण्यात येईल नसता पणन महामंडळ स्वत: शीतगृह चालविणार असल्याचे पणन महामंडळाचे व्यवस्थापक ए.पी.निकम यांनी माहिती दिली. तात्काळ या शीतगृहाचे उद्घाटन करावे आणि शेतकऱ्यांच्या माल ठेवण्यासाठी उपयोगात यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शीतगृहाचे काम कासवगतीने
By admin | Updated: July 17, 2014 01:07 IST