बाजार समितीसाठी ९४ टक्के मतदान

By Admin | Updated: May 3, 2016 00:14 IST2016-05-03T00:07:19+5:302016-05-03T00:14:03+5:30

उस्मानाबाद : राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय अशी चुरस पहावयास मिळालेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियेत सोमवारी मतदान झाले़

94 percent polling for the market committee | बाजार समितीसाठी ९४ टक्के मतदान

बाजार समितीसाठी ९४ टक्के मतदान

४४ उमेदवार : आज मतमोजणी
उस्मानाबाद : राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय अशी चुरस पहावयास मिळालेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियेत सोमवारी मतदान झाले़ तालुक्यातील ११ बुथवर ३२०२ मतदारांपैकी तब्बल २९७६ मतदारांनी मतदान केले असून, याची टक्केवारी ९४ टक्के आहे़ ४४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, मंगळवारी सकाळी महसूल भवनमध्ये मतमोजणी होणार आहे़
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना-भाजपाने एकत्रित येवून राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनल उभा केला होता़ बाजार समितीच्या १८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे १८, सर्वपक्षीयांचे १८ व अपक्ष ८ असे एकूण ४४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते़ निवडणूक प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडल्या़ तालुक्यातील ११ बुथवर सोमवारी सकाळी मतदान प्रक्रिया पार पडली़ यात जिल्हा परिषद कन्या शाळेतील सोसायटी मतदार संघाच्या बुथवर ३३० पैकी ३१२ मतदारांनी मतदान केले़ दुसऱ्या ग्रामपंचायत मतदार संघाच्या बुथवर ३०८ पैकी ३०२, तिसऱ्या बुथवर व्यापारी गटात ३१३ पैकी २८२, हमाल मापाडी गटात १७९ पैकी १२९ जणांनी मतदान केले़ बेंबळी येथील सोसायटी मतदार संघाच्या बुथवर ३३७ पैकी ३२४ जणांनी, ग्रामपंचायत मतदार संघ बुथवर २९९ पैकी २९२ जणांनी, व्यापारी गटाच्या बुथवर २२७ पैकी १९८, ढोकी येथील सोसायटी बुथवर १४० पैकी १३४, व्यापारी बुथवर १०९ पैकी ९४, ग्रामपंचायत बुथवर १४९ पैकी १४७, हमाल मापाडी बूथवर ३४ पैकी ३२ जणांनी मतदान केले़ तेर येथील सोसायटी बुथवर २९० पैकी २८० मतदारांनी, ग्रामपंचायत बुथवर २५३ पैकी २४१ तर व्यापारी बुथवर २३४ पैकी २०९ जणांनी मतदान केले़ तालुक्यातील एकूण ११ बुथवर ३२०२ मतदारांपैकी २९७६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला़
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिवसभर राष्ट्रवादीसह काँग्रेस, भाजपा, शिवसेनेचे उमेदवार प्रत्येक बुथवर फिरून मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात आपल्याच उमेदवारांना मतदान करावे, यासाठी प्रयत्न केले़ मतदान प्रक्रियेनंतर मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयातील महसूल भवनमध्ये मतमोजणी प्रक्रिया होणार आहे़ (प्रतिनिधी)
तीन तासांत निकाल
उस्मानाबाद येथील तहसील कार्यालयातील महसूल भवनामध्ये मतमोजणी प्रक्रिया होणार आहे़ ही मतमोजणी प्रक्रिया तीन तास चालणार असून, त्यानंतर निकाल जाहीर होणार आहे़ या निकालानंतरच मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने राहिला? हे स्पष्ट होणार आहे़ दरम्यान, या निकालाकडे राष्ट्रवादीसह सर्वपक्षीयांचे लक्ष वेधले आहे़

Web Title: 94 percent polling for the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.