कृउबासाठी ८५ टक्के मतदान

By Admin | Updated: July 27, 2015 01:09 IST2015-07-27T00:42:09+5:302015-07-27T01:09:59+5:30

भोकरदन : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत ८५ टक्के मतदान झाले. याची मतमोजणी २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून

85 percent polling for Karubaba | कृउबासाठी ८५ टक्के मतदान

कृउबासाठी ८५ टक्के मतदान


भोकरदन : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत ८५ टक्के मतदान झाले. याची मतमोजणी २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था विनय धोटे यांनी दिली.
भोकरदन बाजार समितीच्या १७ संचालकांसाठी रविवारी तालुक्यात भोकरदन, धावडा, पिंपळगाव रेणुकाई, सिपोरा बाजार, हसनाबाद, राजूर अशा सहा मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यात ग्रामपंचायत मतदार संघात १०५२ पैकी ९१९, सोसायटी मतदार संघात १२३५ पैकी १०७९ तर व्यापारी मतदार संघात ४८४ पैकी ३७४ असे मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. १७ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सोमवारी सकाळी ९ वाजता श्रीकृष्ण मंगल कार्यालयात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६ मतदान केंद्राचे ६ टेबल लावण्यात आले असून, त्यासाठी सहकार खात्याचे ५० कर्मचारी तर १ उपनिरीक्षक, ८ शिपाई व २ महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनय धोटे यांनी दिली.

Web Title: 85 percent polling for Karubaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.