जालना : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना १७९ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. त्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे आहे, अशी माहिती जिल्हा महसूल प्रशासनाने दिली.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाईसदृश्य स्थिती आढावा बैठकीतून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत वाटपासंदर्भात माहिती घेतली. या जिल्ह्यास १७९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. त्यापैकी ९६ टक्के रकमेचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. गारपीटग्रस्त मदत वाटपात ज्या शेतकऱ्यांच्या अगदी सुरुवातीपासून आलेल्या तक्रारी स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इतरांना विश्वासात घेऊन निकाली काढाव्यात, असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.उशिराने आलेल्या तक्रारींचा विचार करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. यावेळी लोकप्रतिनिधी व सदस्यांनी मदत वाटपातील गोंधळ उपमुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिला. (प्रतिनिधी)पीक कर्जाचे ४७ टक्के वाटपया जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत व मध्यवर्ती बँकांमार्फत पीक कर्जाचे ४७ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ए.एस.रंगानायक उपमुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालातून दिली. पीक कर्ज वितरणात जलदगतीने पूर्ण करावेत, अशी अपेक्षा या बैठकीतून व्यक्त करण्यात आली.
गारपीटग्रस्तांना १७९ कोटींची मदत
By admin | Updated: July 17, 2014 01:07 IST