चंद्रपूर जिल्ह्यात ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:48 AM2020-02-28T10:48:18+5:302020-02-28T10:48:39+5:30

कोरपना तालुक्यातील गडचांदूरपासून जवळच असलेल्या सोलापूर फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.

Young man dies in truck collision in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोरपना तालुक्यातील गडचांदूरपासून जवळच असलेल्या सोलापूर फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.
बबलू उर्फ जुबेर रज्जाक शेख रा. गेरेगुडा ता. राजुरा (२५) असे अपघातात मृत तरुणाचे नाव असून तो सोनापूरमार्गे गेरेगुडाहून गडचांदूर येथे येत होता. दरम्यान सोनापूरजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गडचांदूर पोलिसांनी माहिती मिळताच त्याला ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे दाखल केले. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. गडचांदूर पोलिसांनी ट्रक चालकास अटक केली असून ट्रकही ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबियांवर आघात कोसळला आहे.

Web Title: Young man dies in truck collision in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात