तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी, सोबतच्या महिलांमुळे वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 03:15 PM2021-05-18T15:15:18+5:302021-05-18T15:17:52+5:30

सध्या ग्रामीण भागात विडी उद्योगासाठी तेंदुपत्ता संकलन करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. जंगलालगतच्या गावातील महिला पुरुष तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जातात.

A woman who went to collect tendu leaves was seriously injured in a tiger attack. | तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी, सोबतच्या महिलांमुळे वाचला जीव

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी, सोबतच्या महिलांमुळे वाचला जीव

Next

चंद्रपूर - तेंदुपाने संकलनकरिता गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. शकुंतला दिवाकर चौधरी (५०) असे या महिलेचे नाव आहे. त्या रा. गेवरा ता. सावली येथील रहिवासी आहेत. सोबत इतरही काही महिला असल्याने शकुंतला या वाघाच्या हल्ल्यातून बचावल्या आहेत.

सध्या ग्रामीण भागात विडी उद्योगासाठी तेंदुपत्ता संकलन करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. जंगलालगतच्या गावातील महिला पुरुष तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जातात. शकुंलता चौधरी या गोसेखुर्दच्या मुख्य कालव्याकडे तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. सोबतीला असणाऱ्या महिलांनी आरडाओरड करून वाघाला हुसकावले. यामुळे शकुंतला यांची वाघाच्या तावडीतून सुटका झाली.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. वनविभागाने घटनास्थळ गाठून चौकशी करून जखमी शकुंतला यांना अंतरगाव येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. सावली तालुका जंगलव्याप्त असल्याने या परिसरात हिंस्र पशुंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून जंगलातील पाणवठ्यावर पाणी नसल्याने जंगलातील हिंस्त्र पशू पाण्याच्या शोधासाठी गावाच्या दिशेने येत असल्याने मानव प्राणी संघर्ष वाढीस लागल्याचे बोलले जात आहे.

Web Title: A woman who went to collect tendu leaves was seriously injured in a tiger attack.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.