कोरोनामुळे रोजगार हिरावला जन-धन मानधनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 05:00 AM2020-09-22T05:00:00+5:302020-09-22T05:00:09+5:30

जिल्ह्यात जन-धन योजनेचे ५ लाख २६ हजार ६९८ बचत खाते आहेत. यामध्ये महिलांचे २ लाख ६० हजार ४७३ खाते आहेत. महिलांच्या जनधन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रुपये प्रमाणे तीन महिन्याच्या कालावधीत एकून दीडहजारांचे सानुग्रह अनुदान जमा केल्या जाणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांमध्ये प्रचंड नाराजी पुढे आली होती.

Waiting for public money honorarium due to corona employment | कोरोनामुळे रोजगार हिरावला जन-धन मानधनाची प्रतीक्षा

कोरोनामुळे रोजगार हिरावला जन-धन मानधनाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देमहिलांवर आर्थिक संकट : जिल्ह्यात २ लाख ४७३ महिलांचे जन-धन खाते

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊन काळात केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी प्रतिमहा ५०० रूपये सानुग्रह अनुदान जमा केले होते. ही रक्कम गरजुंनी तेव्हाच खर्च केली. जिल्ह्यात आता कोरोनाचा कहर सुरू असल्याने रोजगाराच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे दीड हजार केव्हा मिळणार, याकडे महिलांच्या नजरा लागला आहेत.
जिल्ह्यात जन-धन योजनेचे ५ लाख २६ हजार ६९८ बचत खाते आहेत. यामध्ये महिलांचे २ लाख ६० हजार ४७३ खाते आहेत. महिलांच्या जनधन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रुपये प्रमाणे तीन महिन्याच्या कालावधीत एकून दीडहजारांचे सानुग्रह अनुदान जमा केल्या जाणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांमध्ये प्रचंड नाराजी पुढे आली होती. परिणामी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत जनधन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येकी ५०० रूपये सानुग्रह अनुदान जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला.
त्यानुसार महिलांच्या जन-धन बचत खात्यात ५०० रूपये अनुदान बँकांनी जमा केले. जिल्ह्यातील सुमारे दोन लाख महिलांच्या बचत खात्यात एप्रिल महिन्यातील ५०० रूपयांचे अनुदान डीबीटीच्या माध्यमातून जमा झाले होते. जिल्ह्यात दोन लाख ६० हजार ४७३ महिलांचे जन-धन खाते आहेत. काही महिलांचे दोन खातेही आहेत.
त्यामुळे आधार लिंक असणाऱ्या एकाच खात्यात डीबीटीद्वारे रक्कम वर्ग करण्यात आली. या संदर्भातील माहिती संकलीत केली जात आहे. बँकांनी योग्य नियोजन केल्याने गरजू महिलांना अनुदानाचा लाभ घेता आला, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एन. झा यांनी दिली.


जन-धन खाते तीन लाखांच्या घरात
जिल्ह्यातील जन-धन योजनेच्या ५ लाख २६ हजार ६९८ पैकी २ लाख ६० हजार ४७३ खाते महिलांचे आहेत. तीन महिन्याच्या कालावधीत मिळणाऱ्या दीडहजारांपैकी एप्रिल महिन्यातील ५०० रूपयांचे पहिले अनुदान जमा झाले होते. त्यामुळे हजारो महिलांनी नवीन खात्यासाठी राष्ट्रीय बँकांच्या सर्व्हीस सेंटरमध्ये कागदपत्रे सादर केले. जिल्हा प्रशासनाकडून जन-धन खात्यांची संख्या जाहीर करण्यात आली नाही. मात्र, ही संख्या तीन लाखांच्या घरात झाल्याचा अंदाज सर्व्हीस सेंटर चालकांनी वर्तविला आहे.

Web Title: Waiting for public money honorarium due to corona employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.