vidhan sabha 2019 - युतीत प्रतिष्ठेची; आघाडीत अस्तिवाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:00 AM2019-09-22T06:00:00+5:302019-09-22T06:00:30+5:30

काँग्रेसचे विद्यमान खासदार सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे वरोरा मतदार संघावर भाजपचा डोळा आहे. परंतु शिवसेनेने काँग्रेसचे जिल्हा बँक अध्यक्षाला शिवबंधन बांधून आपला दावा मजबूत केला आहे. काँग्रेस घराणेशाहीत अडकली आहे. चंद्रपुरात भाजपपुढे दमदार आव्हान उभे करण्याच्या तयारीत काँग्रेस असली तरी अंतर्गत विरोधाची शक्यता आहे.

vidhan sabha 2019 - Reputation in the alliance; Battle of Ativa in the lead | vidhan sabha 2019 - युतीत प्रतिष्ठेची; आघाडीत अस्तिवाची लढाई

vidhan sabha 2019 - युतीत प्रतिष्ठेची; आघाडीत अस्तिवाची लढाई

Next
ठळक मुद्देविधानसभेची रणधुमाळी । सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाची कसोटी

राजेश भोजेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच पुन्हा विजयाची पताका फडकवणार असे चित्र होते. मात्र काँग्रेसने शिवसेनेचा आमदार हायजॅक करून उमेदवारी दिल्याने भाजपपुढे नव्हे आव्हान उभे झाले. ही तिकिट देताना अनेक नावे पुढे केली गेली. अशातच माजी जिल्हाध्यक्षाला तिकीट जाहीर करताच कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र नाराजीचा सूर उमटला आणि दिलेला एबी फार्म परत घेऊन शिवसेनेतून आलेले सुरेश धानोरकर यांना तिकीट दिली. धानोरकरांना मिळालेल्या सहानुभूतीच्या बळावर ही जागा काँग्रेसने जिंकली आणि ती महाराष्ट्रात एकमेव ठरली. देशात सर्वत्र भाजपमय वातावरण निर्माण झाले असताना या एका जागेच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या महत्त्वाकाक्षांना नवी पालवी फुटली. परिणामी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत कितपत होते हे निकालाअंती कळेलच, परंतु या राजकीय उलथापालथीमुळे विधानसभा निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष बदलाचेही राजकारण सुरू झाले आणि आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत ते सुरू राहतील, असे चित्र आहे. यामुळे ऐनवेळी कोण कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे जाईल हेही बघायला मिळणार आहे. भाजपमध्येही इच्छुकांची गर्दी झालेली आहे. काही विद्यमान आमदारांना डच्चू देऊन ती जागा आपल्या वाट्याला यावी, या दृष्टीकोनातून इच्छुकांकडून जोरदार हालचाली बघायला मिळत आहे.
काँग्रेसचे विद्यमान खासदार सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे वरोरा मतदार संघावर भाजपचा डोळा आहे. परंतु शिवसेनेने काँग्रेसचे जिल्हा बँक अध्यक्षाला शिवबंधन बांधून आपला दावा मजबूत केला आहे. काँग्रेस घराणेशाहीत अडकली आहे. चंद्रपुरात भाजपपुढे दमदार आव्हान उभे करण्याच्या तयारीत काँग्रेस असली तरी अंतर्गत विरोधाची शक्यता आहे. भाजपातही विद्यमान आमदाराबद्दल नाराजीचा सूर आहे. राजुऱ्यात भाजपात चढाओढ बघायला मिळत आहे. काँग्रेस जुनाच चेहरा रिंगणात उतरविण्याच्या तयारीत दिसत आहे. बल्लारपूरात ना. सुधीर मुनगंटीवार यांना शह देणारा चेहरा काँग्रेसला सापडत नाही आहे. ब्रह्मपुरीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजप नव्या चेहऱ्याची चाचपणी करीत आहे. चिमुरात बंटी ऊर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांनी गेल्या पाच वर्षांत या मतदार संघाचा चेहरामोहरा बदलविल्याने भाजप वरचढ दिसत असून बहुजन वंचित आघाडी काँग्रेसची चिंता वाढविण्याची शक्यता आहे.

विकास कामांवर विरोधकांची दमछाक करणार
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी विजयाचा षटकार मारण्याची संधी आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३० वर्षांपासून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या काळात त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात भाजप मजबूत केली आणि वाढविली. गेल्या पाच वर्षांत त्यांनी अर्थमंत्री पदाचा चंद्रपूर जिल्ह्यासाठी पूरेपूर लाभ मिळवून दिला. राज्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत त्यांनी सर्वाधिक निधी चंद्रपूर जिल्ह्याला उपलब्ध करून दिला. हा निधी जंगखात पडून न ठेवता अवघ्या पाच वर्षात विकासकामे करून दाखविली. चंद्रपूर जिल्ह्यात या निवडणुकीची धुरा त्यांच्यावर असणार आहे. स्वाभाविकच ते विकास दाखवून मते मागतील. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे विरोधकांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे त्यांच्यावर होणाऱ्या निम्न दर्जाच्या आरोपावरून दिसून येते.


विरोधी पक्ष नेता सत्ताधाऱ्यांवर भारी पडणार
विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली. या अल्पकाळात त्यांनी या पदाला साजेशी भूमिका वटविली. राज्यातील प्रश्नांवर ते आक्रमक होताना दिसले. बेधडक व्यक्तिमत्वाचे धनी असलेले वडेट्टीवार या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात सत्ताधारी पक्षांवर हावी होतील असे चित्र आहे. त्यांच्या ब्रह्मपुरी मतदार संघात भाजपकडे चेहराच नाही. इतर पक्षातून किंवा बाहेर जिल्ह्यातून उमेदवार आयात करण्याच्या हालचाली भाजपात सुरू असल्याचे समजते. परंतु हे चेहरेही त्यांच्यापुढे तग धरतील, असे वाटत नसल्याच्या मतदारांत चर्चा आहे. वडेट्टीवारांचे आव्हान भाजपला सहज पेलेल असे चित्र सध्यातरी जिल्ह्यात दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची धुरा त्यांच्या खांद्यावर असून सत्ताधारी आणि विरोधकांचा कलगीतुरा बघायला मिळणार आहे.

राजुरा व चंद्रपुरात काँग्रेसचे आव्हान
चंद्रपुरात काँग्रेसकडून महेश मेंढे तयारीत असले तरी काही महिन्यांपूर्वी शिवसेना सोडलेले किशोर जोरगेवार काँग्रेसच्या तिकीटसाठी चांगलीच फिल्डिंग लावून आहे. गेल्या निवडणुुकीतील दुसऱ्या क्रमाकांच्या मतांवर ते तिकीट मागत आहे. राजुºयात काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे हे अत्यल्प मतांनी पराभूत झाले होते. तर स्वभापकडून अ‍ॅड. वामनराव चटप तयारीत आहेत.

Web Title: vidhan sabha 2019 - Reputation in the alliance; Battle of Ativa in the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.