४० रूपयांच्या वॉल्व्हसाठी रोज २३ ड्रम पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 06:00 AM2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:34+5:30

नागभीडला तपाळ पाणी पुरवठा योजनेद्वारा पाण्याचा पुरवठा होतो. तहसील कार्यालयाजवळील पाण्याच्या टाकीत पाणी जमा झाल्यानंतर तिथून मग शहरात पाण्याचे वितरण होते. या टाकीत पाणी टाकणारी पाईप लाईन तहसील रोडवर असलेल्या कसर्ला नहराजवळ लीक आहे. हा एअर लिक असल्याची माहिती आहे. मात्र या लिकचा वॉल्व्ह खराब झाला आहे. या खराब वॉल्व्हमुळे पाण्याचा मोठया प्रमाणावर विसर्ग होत आहे.

undefined | ४० रूपयांच्या वॉल्व्हसाठी रोज २३ ड्रम पाण्याचा अपव्यय

४० रूपयांच्या वॉल्व्हसाठी रोज २३ ड्रम पाण्याचा अपव्यय

googlenewsNext
ठळक मुद्देपालिकेचे दुर्लक्ष। सहा महिन्यांपासून अशीच स्थिती

घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : केवळ ४० रुपये किमतीच्या वॉल्व्हअभावी रोज २३ ड्रम पाण्याचा हकनाक अपव्यय होत आहे आणि हा अपव्यय गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
नागभीडला तपाळ पाणी पुरवठा योजनेद्वारा पाण्याचा पुरवठा होतो. तहसील कार्यालयाजवळील पाण्याच्या टाकीत पाणी जमा झाल्यानंतर तिथून मग शहरात पाण्याचे वितरण होते. या टाकीत पाणी टाकणारी पाईप लाईन तहसील रोडवर असलेल्या कसर्ला नहराजवळ लीक आहे. हा एअर लिक असल्याची माहिती आहे. मात्र या लिकचा वॉल्व्ह खराब झाला आहे. या खराब वॉल्व्हमुळे पाण्याचा मोठया प्रमाणावर विसर्ग होत आहे. आणि हा विसर्ग गेल्या सहा महिन्यांपासून होत असल्याची माहिती आहे.
हे लिकेज अतिशय मोकळ्या जागेवर आणि ऐन मोठया रस्त्यावर असल्याने कोणाच्याही सहज लक्षात येत असले तरी ते तपाळ योजना अधिकाऱ्यांच्या किंवा नगर परिषद अधिकाऱ्यांच्या लक्षात का येऊ नये, हे एक कोडेच आहे.
'जल है तो कल है' अशा व यासारख्या म्हणींचे विविध दाखले देत जल साक्षरतेचे धडे पाणी पुरवठा विभागाकडून मोठया प्रमाणावर देण्यात येत आहेत. या जलसाक्षरतेवर शासनाकडून मोठया प्रमाणावर खर्चही करण्यात येत आहे. मात्र नागभीड नगर परिषद किंवा तपाळ पाणी पुरवठा योजना या जल साक्षरतेचे आपल्या कृतीतून वाभाडे तर काढत नाही ना, अशी कोणी शंका घेतली तर ती अतिशयोक्तीची ठरणार नाही.
दरम्यान, नागभीड येथे ग्रामपंचायत असताना पाणी पुरवठा योजनेचे अनेक वर्ष काम पाहिलेल्या व तपाळ योजनेची खडानखडा माहिती असलेल्या देविदास मरघडे यांनी सांगितले की या लिकेजबाबत मी नगर परिषदेला व तपाळ योजनेला अवगत केले आहे. या लिकेजमधून २२५ लिटरचा एक ड्रम याप्रमाणे २४ तासात २३ ड्रम पाण्याचे व्यय होत आहे. रात्री या लिकेजचा फोर्स तीव्र असतो. या लिकेजच्या दुरूस्तीसाठी केवळ ४० रुपयांची गरज आहे, हे विशेष.

Web Title: undefined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी