वृत्तपत्रातून कोरोनाचा धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:14+5:30

वर्तमानपत्रांनी आपली विश्वासार्हता जपली आहे. त्यामुळे आपण या माध्यमावर विश्वास ठेवू शकतो. जगात व आपल्या अवती-भवती नेमके काय सुरु आहे. हे आपल्याला वर्तमानपत्रातूनच कळते. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचलेच पाहिजे. सध्या सर्वांना कोरोनाची भीती सतावत आहे. वर्तमानपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाही जीवंत ठेवण्याचे मोलाचे काम वृत्तपत्र निर्भीडपणे करीत आहेत.

There is no threat of corona from the newspaper | वृत्तपत्रातून कोरोनाचा धोका नाही

वृत्तपत्रातून कोरोनाचा धोका नाही

Next
ठळक मुद्देडॉक्टर अशोक वासलवार : वृत्तपत्रांनी जपली विश्वासार्हता

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संक्रमनासोबत युद्ध करताना आपण सुरक्षित अंतराचे नियम पाळणे, नियमितपणे साबणाने हात धुणे आणि मास्क घालणे आवश्यक आहे. हे सर्व करताना वर्तमानपत्राच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा फैलाव होतो, ही भीती चुकीची आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही वर्तमान पत्रामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव होत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाची कसलीही भीती मनात न बाळगता वर्तमानपत्र वाचावे, असे मत येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक वासलवार यांनी व्यक्त केले.
वर्तमानपत्रांनी आपली विश्वासार्हता जपली आहे. त्यामुळे आपण या माध्यमावर विश्वास ठेवू शकतो. जगात व आपल्या अवती-भवती नेमके काय सुरु आहे. हे आपल्याला वर्तमानपत्रातूनच कळते. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचलेच पाहिजे. सध्या सर्वांना कोरोनाची भीती सतावत आहे. वर्तमानपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाही जीवंत ठेवण्याचे मोलाचे काम वृत्तपत्र निर्भीडपणे करीत आहेत. वर्तमानपत्राद्वारे जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडली जाते. अनेक घटकांच्या मागण्या, प्रलंबित प्रश्न सरकार दरबारी मांडून ते सोडविण्याचे काम वर्तमानपत्र सक्षमपणे करीत आहेत. त्यामुळे प्रत्येकांना जशी शरीरस्वास्थासाठी व्यायामाची गरज असते, तसेच बृद्धीला चालना मिळण्यासाठी वर्तमानपत्र वाचनाची आवश्यकता असते. लोकमत वृत्तपत्र संपूर्णत: सॅनिटाईज करून वितरीत केले जाते. बाजारात मिळणाऱ्या इतर वस्तुंप्रमाणे वृत्तपत्र आपल्या हातात पोहचेपर्यंतची जी एक साखळी असते. त्या साखळीतही पूर्ण काळजी घेतली जाते. वृत्तपत्र हाताळल्याने कोरोनाचे संक्रमण होण्याचे प्रमाण नगण्य आहे. याऊलट कोरोनापासून स्वच्छचा आणि समाजाचा बचाव कशा प्रकारे करता येईल. हेच वृत्तपत्रातून स्पष्टपणे सांगण्यात येते. कोरोनाच्या लसीसंदर्भात जगात काय सुरु आहे, हे वृत्तपत्रातून खात्रीशीरपणे कळते. त्यामुळे समाजातील कोरोनाची भीती दूर होण्यास मदत होत आहे.

Web Title: There is no threat of corona from the newspaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.