आरोपींवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:50+5:30

राजगृह आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे हे एक महत्त्वाचे स्मारक आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येतात. मात्र या निवास्थानाची तोडफोड केल्यान बौद्ध बांधवाच्या भावना दुखावल्याने जिल्ह्याभरात आंबेडकर अनुयायी, सामाजिक संस्था व राजकीय पक्षातर्फे निषेध करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

Take stern action against the accused | आरोपींवर कठोर कारवाई करा

आरोपींवर कठोर कारवाई करा

Next
ठळक मुद्देराजगृहावरील हल्ला प्रकरण : विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. राजगृह आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे हे एक महत्त्वाचे स्मारक आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येतात. मात्र या निवास्थानाची तोडफोड केल्यान बौद्ध बांधवाच्या भावना दुखावल्याने जिल्ह्याभरात आंबेडकर अनुयायी, सामाजिक संस्था व राजकीय पक्षातर्फे निषेध करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाची तोडफोड करुन सीसीटीव्ही कॅमेरा व बागेतील कुंड्यांचे नुकसान केलेल्या घटनेचा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध करुन आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन नेते प्रवीण खोब्रागडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी अशोक निमगडे, प्रेमदास बोरकर, अशोक रामटेके, विशालचंद्र अलोणे, ज्योती शिवणकर, गीता रामटेके, प्रेरणा करमरकर, अनुजा वानखेडे, प्रतिक डोर्लिकर, एस. के वेल्हेकर, नागसेन वानखेडे, राजकुमार जवादे, अशोक ठेंबरे, (समता सैनिक दल) अशोक फुलझले (समता सैनिक दल), प्रेमदास रामटेके, सहारे आदी उपस्थित होते.
ब्रह्मपुरीत तहसीलदारांना निवेदन
ब्रह्मपुरी : राजगृह येथे तोडफोड केलेल्या घटनेचा वंचित बहुजन आघाडी शाखा ब्रह्मपुरीतर्फे निषेध करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी तालुका महासचिव लिलाधर वंजारी, जिल्हा सल्लागार डॉ. प्रेमलाल मेश्राम, उपाध्यक्ष कमलेश मेश्राम, उपाध्यक्ष नरेंद्र मेश्राम, अरुण सुखदेवे, सचिव डी. एम. रामटेके, महिला आघाडीच्या अध्यक्ष लिना रामटेके, महासचिव शितल गायकवाड आदी उपस्थित होते.
रिपब्लिकन सेना, चंद्रपूर
चंद्रपूर : राजगृहाची तोडफोड केलेल्या घटनेचा रिपब्लिकन सेना, चंद्रपूरच्या वतीने निषेध करुन असे कृत करणाºयावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथागत पेटकर यांनी केली आहे.

शहर काँग्रेस कमिटीने केली निदर्शने
चंद्रपूर : राजगृहावरील घटनेचा निषेध करीत आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहर काँग्रेस कमिटीतर्फे पालकमंत्री विजय वड्डेटीवार व खासदार बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुरात निदर्शने करण्यात आले. चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेबांचा पुतळ्याला नमन करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला. यावेळी महिला शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, युसुफभाई हुसैन, एनएसयुआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, युवक प्रदेश सचिव सचिन कत्याल, युवक शहर अध्यक्ष राजेश अड्डर, उपाध्यक्ष नवशाद शेख, अश्विनी खोब्रागडे, अनुसूचित जाती जमात शहर महिला अध्यक्ष अनु दहेगावकर, प्रिया चंदेल, परवीन सय्यद, वाणी दारला, एकता गुरले, संजय रत्नपारखी, प्रसन्न शिरवार, पिंकी दीक्षित, संजय गंपावार, दुर्गेश कोडाम, रामकृपाल यादव, मोहन डोंगरे, गोपाल अमृतकर, खालिक भाई, पप्पू सिद्दीकी, अनीश राजा आदी उपस्थित होते.

Web Title: Take stern action against the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.