लसीकरण केंद्रात गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:00 AM2021-03-04T05:00:00+5:302021-03-04T10:30:47+5:30

शहरात १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील सर्वसामान्य नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली. लसीकरणासाठी को-विन अ‍ॅप, आरोग्य सेतू अ‍ॅप व संकेतस्थळाचा पर्याय देण्यात आला. लस घेण्याकरिता सोयीप्रमाणे दिवस व वेळेची निवड करण्याची मुभा असल्याने चंद्रपूर शहरातील नागरिक लसीकरण केंद्रात गर्दी करीत आहेत. यातून कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही.

Separate registration room to avoid congestion at the vaccination center | लसीकरण केंद्रात गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष

लसीकरण केंद्रात गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष

Next
ठळक मुद्देमनपाचा प्रयोग : कोरोना लस घेणाऱ्या ज्येष्ठांची अडचण दूर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :  को-विन अ‍ॅपवर नोंदणी करण्यास अडचणी आल्यास  थेट कोरोना लसीकरण केंद्रातच नोंदणीनंतर लसीकरणाची मुभा होती. मात्र, लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत असल्याने त्यावर उपाय म्हणून आता स्वतंत्र नोंदणी कक्ष तयार करण्याचा निर्णय महानगर पालिकेने बुधवारी घेतला आहे. 
शहरात १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील सर्वसामान्य नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली. लसीकरणासाठी को-विन अ‍ॅप, आरोग्य सेतू अ‍ॅप व संकेतस्थळाचा पर्याय देण्यात आला. लस घेण्याकरिता सोयीप्रमाणे दिवस व वेळेची निवड करण्याची मुभा असल्याने चंद्रपूर शहरातील नागरिक लसीकरण केंद्रात गर्दी करीत आहेत. यातून कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रापासून नोंदणी कक्ष वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता संगणक संच, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. 

कोण करू शकतो नोंदणी?
एका मोबाईल क्रमांकावरून चार नावे नोंदविता येणार असल्याने ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांनाच या नोंदणी कक्षाचा लाभ घेता येईल. शिवाय, ज्या व्यक्तींना ऑनलाईन स्लॉट बुक करता येत नाहीत अशांनी आधारकार्ड, छायाचित्र आयडी, पॅनकार्ड व ओळखपत्र सादर केल्यास नोंदणी केली जाणार आहे.

कोरोना लस घेताना पुणे व मुंबईसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चंद्रपुरात लसीकरण केंद्र व नोंदणी कक्ष वेगवेगळे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक व्यक्ती विविध कारणे सांगून एकाचवेळी गर्दी करतात. कोरोना बाधितांची संख्या बघता असा प्रकार टाळणे गरजेचे आहे. 
 -आविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी मनपा, चंद्रपूर
 

चंद्रपुरातील कोरोना लसीकरण केंद्र
दुर्गापूर येथील आरोग्य केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रूग्णालय, महानगर पालिकातंर्गत रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, टागोर प्राथमिक शाळा, मातोश्री शाळा तुकूम, पोलीस रूग्णालय (केवळ पोलीस) आदी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे. सोमवारपासून शहरातील पाच खासगी हॉस्पीटलमध्ये लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. 

लसीकरणासाठी पुन्हा एक केंद्र वाढविणार
 चंद्रपूर शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी अडचणी येऊ नये, यादृष्टीने एक लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार आहे. दोन-तीन दिवसात केंद्र सुरू झाल्यास लसीकरण केंद्रांची संख्या चार होणार आहे. अर्बन टॉस्क फोर्स बैठकीत महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी उपस्थित होते.

 

Web Title: Separate registration room to avoid congestion at the vaccination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.