रस्ते व प्राथमिक सुविधा तातडीने उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 AM2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:25+5:30

राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर आपल्या पहिल्या दौऱ्यामध्ये त्यांनी ब्रह्मपुरी येथे विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्ह्यातील अधिकाºयांनादेखील याठिकाणी बैठकीला बोलविण्यात आले होते. या बैठकीमध्ये त्यांनी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामकाजामुळे व नियम न पाळता सुरू असलेल्या कामामुळे जनतेला होत असलेला त्रास निदर्शास आणून दिला.

Roads and primary facilities will be made available immediately | रस्ते व प्राथमिक सुविधा तातडीने उपलब्ध करणार

रस्ते व प्राथमिक सुविधा तातडीने उपलब्ध करणार

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार: पालकमंत्र्यांकडून विविध विभागांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या भागातील रस्ते पूल यासोबतच प्राथमिक पायाभूत सुविधा निर्माणाला गती देण्यासोबतच ब्रह्मपुरी येथे नवीन बसस्थानक, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह. ब्रह्मपुरी, सिंदेवाही येथे पोलीस स्टेशनची नवीन इमारत उभारण्याचे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन,इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीन विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर आपल्या पहिल्या दौऱ्यामध्ये त्यांनी ब्रह्मपुरी येथे विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्ह्यातील अधिकाºयांनादेखील याठिकाणी बैठकीला बोलविण्यात आले होते. या बैठकीमध्ये त्यांनी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामकाजामुळे व नियम न पाळता सुरू असलेल्या कामामुळे जनतेला होत असलेला त्रास निदर्शास आणून दिला. रस्ते निर्माण करताना नागरिकांना होणारा त्रास व त्याच्या दर्जाबाबत जागरूक राहण्याचे संकेतदेखील त्यांनी दिले.
चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची परिस्थिती अतिशय वाईट असून याठिकाणी नवे दर्जेदार विश्रामगृह उभारण्यात यावे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या आराखडयावर कृती करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ब्रम्हपुरी -सावली तालुक्यातील गुंजेवाही, चीकमारा, बोथली, हरंबा, मेंढळी, कापली चाहाड, जुगनाळा, चिखलगाव, लाडज आदी ठिकाणच्या रस्ते, पूल, पुलाची उंची वाढवणे यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
यावेळी परिवहन विभागाचादेखील ना. वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. यामध्ये ब्रह्मपुरी येथे विश्रामगृह, न्यायालय व लगतच्या परिसरात जनतेच्या सोयीचे नवे आधुनिक बसस्थानक उभारण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी जागा उपलब्धतेबाबत प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी परिसरातील समस्यांविषयी आढावा घेत विविध प्रश्न अधिकाºयांना विचारले. जे प्रश्न निकाली निघाले नाहीत, ते निकाली काढण्याचे निर्देश दिले.
यावेळी अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, अभियंता एच.एस. कोठारी, ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, सिंदेवाहीचे उप अभियंता अंकिता पाटील, सावली उपअभियंता चंद्रशेखर कटरे, ब्रम्हपुरी उपअभियंता कुशनवार, सिंदेवाहीचे तहसिलदार गणेश जगदाळे, ब्रह्मपुरीचे तहसीलदार विजय पवार, सावलीच्या तहसीलदार पुष्पलता कुमरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सावली येथे बांधकाम विभागाचे कार्यालय
सावली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय निर्माण करण्याबाबतचे निर्देशही ना. वडेट्टीवार यांनी यावेळी दिले. गोसीखुर्दच्या संदर्भात यावेळी त्यांनी आढावा घेतला. ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रसूती रोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याबाबतची माहिती पुढे आल्यावर यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रुग्णालयाला आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृषी विभागातील जलयुक्त शिवार योजनेमधील प्रलंबित सर्व कामे पूर्ण करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. यावेळी वीज मंडळाकडून नवीन जोडणी देताना होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार
सिंदेवाही, ब्रह्मपुरी येथील नाटयगृह सावली येथील वन विश्रामगृह, सिंदेवाही येथील हॉस्पिटल, ब्रह्मपुरी येथील आदिवासी विकास विभागामार्फत अपूर्ण असणारे वसतिगृह तसेच ब्रह्मपुरी, सिंदेवाही येथील पोलीस स्टेशन इमारत, ब्रह्मपुरीचे क्रीडा संकुल प्रकल्पांना गती देण्याबाबतही ना. वडेट्टीवार यांनी यावेळी निर्देश दिले. यावेळी त्यांनी ब्रह्मपुरी येथे दोनशे क्षमतेचे ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह उभारणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी निधी उपलब्ध असून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

Web Title: Roads and primary facilities will be made available immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.