कोरोना व्हेरिएंटच्या धास्तीने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:00 AM2021-12-02T05:00:00+5:302021-12-02T05:00:56+5:30

 जिल्ह्यात तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती, तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती जसे की, खेळाडू अभिनेते इत्यादी, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केले असावे.

Restrictions imposed again in the district due to fear of Corona variant | कोरोना व्हेरिएंटच्या धास्तीने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू

कोरोना व्हेरिएंटच्या धास्तीने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोविड १९ या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, विषाणूच्या फैलावास प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने बुधवारी नवीन नियमावली जारी केली आहे. यामध्ये काही निर्बंध लादले असून, संपूर्ण लसीकरण, कोविड अनुरूप वर्तन, कार्यक्रमावरील निर्बंध, कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम व दंडाचाही समावेश आहे.
 जिल्ह्यात तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती, तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती जसे की, खेळाडू अभिनेते इत्यादी, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केले असावे. जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे, असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन, मेळावे इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे. अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.  हा आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात २९ नोव्हेंबर, २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी नियम 
कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणावरून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, या बाबतीतील भारत सरकारच्या निर्देशांद्वारे विनिमय करण्यात येईल. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेले आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक राहील.

कार्यक्रमांत ५० टक्के लोकांनाच परवानगी
- चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृह इत्यादी बंदिस्त, बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या, उपक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी असेल.
- संपूर्ण खुली जागा, समारंभ किंवा संमेलनासाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी देण्यात आली.

 

Web Title: Restrictions imposed again in the district due to fear of Corona variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.