कोविड मृत्यूची नोंद केंद्राकडे असल्यास नातेवाईकांच्या कागदपत्रांची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 11:27 PM2021-12-02T23:27:52+5:302021-12-02T23:29:51+5:30

शासनाने ऑनलाईन वेबपोर्टल विकसित केले. याद्वारे कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह साहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन साहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल.

Relatives' documents are not required if Kovid's death is reported to the Center | कोविड मृत्यूची नोंद केंद्राकडे असल्यास नातेवाईकांच्या कागदपत्रांची गरज नाही

कोविड मृत्यूची नोंद केंद्राकडे असल्यास नातेवाईकांच्या कागदपत्रांची गरज नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :  कोविड आजाराने  मृत  पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकाला  ५० हजार  सानुग्रह साहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर २०१ रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने २६ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी केला आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची नोंद केंद्र सरकारकडे असल्यास अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल.
शासनाने ऑनलाईन वेबपोर्टल विकसित केले. याद्वारे कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह साहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन साहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोविडमुळे मृत्यूची नोंद झाली आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोविड मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर हाेईल. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविडमुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील. प्रकरण नामंजूर झाल्यास अर्जदारास तक्रार निवारणासाठी गठित  समितीकडे अपिल करण्याचे व या समितीस सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे अधिकार आहे. 

वारसांना अपील करण्याची संधी
सानुग्रह साहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज  सात दिवसांकरीता वेबपोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील. जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास साहाय्य मिळावे, यासाठी अपील करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर अर्जानुसार अर्जदाराच्या आधार संलग्नीय बँक खात्यामध्ये सानुग्रह साहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे,

 

Web Title: Relatives' documents are not required if Kovid's death is reported to the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.