कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:43+5:30

चंद्रपुरातील उत्तर प्रदेश बलिया येथून परत आलेला महाकाली कॉलनी येथील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. ऊर्जानगर येथील ४० वर्षीय महिला, हवेली गार्डन येथील नागपुरवरून परत आलेला युवक बाधित ठरला आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपकार्तून लालपेठ कॉलनी येथील हेल्थ क्लबजवळील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. श्वेता रेसिडेंट येथील पुरुष बाधित ठरला आहे.

Recurrence of corona infection | कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक

कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील रुग्णसंख्या झाली ८३३ । नवे ५६ बाधित वाढले, चंद्रपूरात तिसरा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शनिवारी पुन्हा कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५६ बाधितांची वाढ झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ८३३ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४६६ कोरोना बाधितांना उपचाराअंती सुटी देण्यात आली आहे. तर सध्या ३६४ बाधितांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, दुर्गापृर येथील ६७ वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. हा बाधित सारीचा रुग्ण होता. जिल्ह्यात आतापर्यंत तीन बाधितांचा मृत्यू झालेला आहे.
शनिवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर येथील २७ बाधित , बल्लारपूर तालुक्यातील २२, ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच, मूल तालुक्यातील दोन, वरोरा तालुक्यातील एका बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपुरातील उत्तर प्रदेश बलिया येथून परत आलेला महाकाली कॉलनी येथील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. ऊर्जानगर येथील ४० वर्षीय महिला, हवेली गार्डन येथील नागपुरवरून परत आलेला युवक बाधित ठरला आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपकार्तून लालपेठ कॉलनी येथील हेल्थ क्लबजवळील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. श्वेता रेसिडेंट येथील पुरुष बाधित ठरला आहे. यासोबतच तुकुम, पोलीस कॉलनी, इंदिरा नगर दुर्गा चौक, बंगाली कॅम्प येथेही बाधित निघाले आहेत. रामनगर कॉलनी, रामाळा तलाव, मेजर गेट, पठाणपुरा, कुंदन प्लाझा, जटपुरा गेट, बालाजी वॉर्ड गोपाल पुरी, सवारी बंगला पठाणपुरा, श्याम नगर, जीएमआर वरोरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर व मूल येथेही बाधित आढळले आहेत.

आतापर्यंत ११२०८ अ‍ॅन्टिजेन तपासण्या पूर्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार २०८ नागरिकांची अ‍ॅन्टिजेन तपासणी केलेली आहे. यापैकी १०० पॉझिटिव्ह आले असून ११ हजार १०८ जण निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९१ हजार ५६२ नागरिक दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये एक हजार २१७ नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर एक हजार ६२० नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.

१९ ते ४० वयोगटातील ४८२ बाधित
जिल्ह्यातील बाधितांची संख्या ८१६ वर पोहोचली आहे. यापैकी ० ते ५ वर्षे वयोगटातील १५ बाधित, ६ ते १८ वर्ष वयोगटातील ५६ बाधित, १९ ते ४० वर्षे वयोगटातील सर्वाधिक ४८२ बाधित, ४१ ते ६० वर्षे वयोगटातील १९१ बाधित तर ६१ वर्षावरील ३३ बाधित आहेत.

जिल्ह्याबाहेरील ४२ बाधित
शुक्रवारपर्यंत केवळ जिल्ह्यातील बाधित रुग्ण ६८१ आहेत. जिल्ह्याबाहेरील ४२ बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या ५४ आहे.

जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन
जिल्ह्यात सध्या ७६ कंटेनमेंट झोन सुरू आहेत. तर ८५ कंटेनमेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या ८५ कंटेनमेंट झोनचा सर्वेक्षण अहवाल पुढीलप्रमाणे आहे. ३४१ आरोग्य पथकाद्वारे १५ हजार १८७ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे.
 

Web Title: Recurrence of corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.