घुग्घुसचा कारभार रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:29 AM2021-01-23T04:29:22+5:302021-01-23T04:29:22+5:30

घुग्घुस : घुग्घुस ग्रामपंचायतीला नवीन वर्षात नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. नगरपरिषदेच्या प्रशासक पदाची तहसीलदार यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र ...

Rambharose is in charge of Ghughhus | घुग्घुसचा कारभार रामभरोसे

घुग्घुसचा कारभार रामभरोसे

Next

घुग्घुस : घुग्घुस ग्रामपंचायतीला नवीन वर्षात नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. नगरपरिषदेच्या प्रशासक पदाची तहसीलदार यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र २२ दिवस होऊनही कामकाज अधिकाऱ्याविना कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांचे काम ठप्प आहे.

घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषद मिळावी, यासाठी सर्वपक्षीय एकत्रित येऊन संघर्ष केल्यानंतर ३१ डिसेंबरला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. सहा दिवसानंतर तहसीलदार गौड यांनी घुग्घुस नगर परिषदेची सूत्रे स्वीकारली. मात्र तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या नियोजनात व्यस्त असल्याने घुग्घुस नगर परिषदेच्या कामात अडचणी निर्माण झाल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुका व निकालाची प्रक्रिया पार पडली. मात्र आज शुक्रवारपर्यंतही ते कार्यालयात आलेले नव्हते. नगर परिषदेच्या कामकाजाचे नियोजन नसल्याने सर्व कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी नेहमीप्रमाणे गावातील साफसफाई, पाणी पुरवठा, पथदिवे जैसे थे सुरू असले, तरी कार्यालयीन कामकाज केवळ अर्ज देण्यापुरतेच सुरू आहे. ग्रामपंचायत कार्यालयावर व मुख्यदारावर ग्रामपंचायतीचे नाव अजूनही कायम असल्याने घुग्घुस नगर परिषद केवळ कागदोपत्रीच तर झाली नाही, अशी शंका सर्वसामान्य नागरिकांना येत आहे.

Web Title: Rambharose is in charge of Ghughhus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.