जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:10 AM2018-11-16T00:10:26+5:302018-11-16T00:11:07+5:30

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून आणि परिश्रमातून राज्यात लागू झालेला जादूटोणाविरोधी कायदा हा अतिशय क्रांतीकारी आहे. कायद्याचा जनमाणसात प्रभारीरित्या प्रचार-प्रसार आणि प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी झाल्यास जनसामान्यांचे अंधश्रद्धांमुळे होणारी फसवणूक व शोषण थांबेल.

Promote anti-superstition legislation | जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार करा

जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार करा

Next
ठळक मुद्देश्याम मानव : विकास केंद्रातील बैठकीत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून आणि परिश्रमातून राज्यात लागू झालेला जादूटोणाविरोधी कायदा हा अतिशय क्रांतीकारी आहे. कायद्याचा जनमाणसात प्रभारीरित्या प्रचार-प्रसार आणि प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी झाल्यास जनसामान्यांचे अंधश्रद्धांमुळे होणारी फसवणूक व शोषण थांबेल. अंधश्रद्धांना बळी पडलेल्यांना न्याय मिळणे सोपे होईल. याकरिता अंनिस कार्यकर्त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी प्रसार व प्रचारासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन अ. भा. अंनिसचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी येथे केले.
अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नियोजन आणि अंमलबजावणी मंडळाच्या स्थानिक विकास केंद्र येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अंनिसचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, राष्ट्रीय महासचिव हरिश देशमुख, प्रकल्प संचालक सुरेश झुरमुरे, अशोक घाटे, अ‍ॅड. गणेश हलकारे, आदींसह नियोजन व अंमलबजावणी मंडळाचे देशभरातील सदस्य उपस्थित होते.
सदर बैठकीत संघटन बांधणी, लढा अंधश्रद्धा निर्मूलनाचा, समाज माध्यमांचा प्रभावी उपयोग, विद्यापीठ, महाविद्यालय व शालेय स्तरावरील अभियान, युवा-विद्यार्थी व महिला संघटन आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. पुढील वाटचालीच्या नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी अ.भा.अनिस चंद्रपूर जिल्हा शाखा बल्लारपूर शाखा, अनिसचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे, जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड गोविंद भेंडारकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे, निलेश पाझारे, तालुका संघटक राजेश गावंडे, मंगेश नैताम, चंद्रकांत पावडे, सुरेश पंदीलवार, सचिन दुधे, रजनी कार्लेकर, अविनाश आंबेकर, भारती रामटेके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Promote anti-superstition legislation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.