मार्गाच्या कामात पाइपलाइन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:29 AM2021-01-23T04:29:18+5:302021-01-23T04:29:18+5:30

गोंडपिपरी : मार्गाचे काम करीत असताना मुख्य पाइपलाइन फुटली. परिणामी, चार गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला. या चारही गावांत ...

Pipeline ruptured during road work | मार्गाच्या कामात पाइपलाइन फुटली

मार्गाच्या कामात पाइपलाइन फुटली

Next

गोंडपिपरी : मार्गाचे काम करीत असताना मुख्य पाइपलाइन फुटली. परिणामी, चार गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला. या चारही गावांत पाण्याची मोठीच टंचाई असते. ही बाब लक्षात येताच, गुरबक्षानी कंपनीने पुढाकार घेत चारही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

किरमीरी-हिवरा-पोडसा मार्गाचे काम गुरबक्षानी या कंपनीद्वारे सुरू आहे. या मार्गाचे काम करीत असताना चेकबापूर पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाइपलाइन फुटली. त्यामुळे कुडेनांदगाव, चेकनांदगाव, हेटीनांदगाव, टोलेनांदगाव या चार गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला. या चारही गावांत नैसर्गिक पाण्याचे स्रोत नाही. पाणीपुरवठा बंद झाल्याने चारही गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक नागेश ठाकरे यांना मिळाली. त्यांनी लगेच गावात टँकर पाठविले. मागील तीन दिवसांपासून टँकरच्या पाण्याने गावकरी तहान भागवित आहेत. दरम्यान, फुटलेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, लवकरच पाणीपुरवठा पूर्वरत सुरू होईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

Web Title: Pipeline ruptured during road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.