जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, 123 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 05:00 AM2021-03-06T05:00:00+5:302021-03-05T23:30:37+5:30

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने अ‍ॅन्टीजेन व आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढवली. प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच बाधितांवर उपचार करण्यासाठी  मूलभूत सुविधा निर्माण केल्या. कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हेल्थ सेंटर व प्रत्येक तालुक्यात अ‍ॅन्टीजेन तसेच आरटीपीआर चाचण्यांसाठी केंद्र तयार केले.

Outbreak of corona in the district, 123 positive | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, 123 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, 123 पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देबाधित महिलेचा मृत्यू : शहरी व ग्रामीण भागातही दररोज वाढताहेत रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असताना जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, कोरोना गेल्याच्या भ्रमात राहून बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांना शुक्रवारी जोरदार धक्का बसला. एकाच दिवशी तब्बल १२३ जणांना कोरोनाची बाधा झाली तर एका महिलेचा मृत्यू झाला.त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. 
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने अ‍ॅन्टीजेन व आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढवली. प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच बाधितांवर उपचार करण्यासाठी  मूलभूत सुविधा निर्माण केल्या. कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हेल्थ सेंटर व प्रत्येक तालुक्यात अ‍ॅन्टीजेन तसेच आरटीपीआर चाचण्यांसाठी केंद्र तयार केले.

चंद्रपूर हॉट स्पॉट होण्याची भीती
जिल्ह्यात बाधितांची संख्या २४ हजार ४९ वर पोहोचली. सध्या ५०२ बाधित उपचार घेत आहेत. दोन लाख १९ हजार ७७७ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी एक लाख ९३ हजार ५१८ नमुने निगेटीव्ह आले. मात्र, चंद्रपूर शहरातच रूग्णसंख्या वाढत असल्याने हॉट स्पॉट होण्याची भीती आहे.
 

त्रिसुत्रीचा विसर महागात पडणार
नियमित मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे ही साधी त्रिसूत्री पाळण्याचे भान नागरिकांना राहिले नाही. त्यामुळे शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक होऊन तब्बल १२३ जणांना बाधा झाली. जिल्ह्यात २४ तासात ५४ जणांनी कोरोनावर मात केली तर बल्लारपूर येथील ६८ वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे.

१९५९ जणांनी घेतली कोरोनाची लस
शुक्रवारी १,९५९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. १९०० जणांना लस देण्याचे टार्गेट होते. यामध्ये आरोग्य कर्मचार, ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक तसेच ६० वर्षांवरिल ज्येष्ठांचा समावेश होता. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनीही दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लस टोचून घेतली.

तालुकानिहाय रूग्ण
आज बाधित आढळलेल्या १७६ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ३३, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर एक, भद्रावती आठ, ब्रह्मपुरी एक, नागभीड तीन, सावली १९, राजूरा आठ, चिमूर सहा, वरोरा ५९, कोरपना १४, जिवती २० व इतर ठिकाणच्या तीन रूग्णांचा समावेश आहे.

 

Web Title: Outbreak of corona in the district, 123 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.