फक्त चार हजार 800 डोस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 05:00 AM2021-04-09T05:00:00+5:302021-04-09T05:00:41+5:30

आरोग्यसेवक, कोरोना योद्धा, ४५ वर्षांवरील सर्व व ६० वर्षांवरील नागरिकांचे वेगाने लसीकरण सुरू झाले. लस घेण्यात अडचणी येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ९१ केंद्र तयार केले. चंद्रपूर महानगर पालिका आरोग्य विभागाने १४ केंद्रांवरून लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली. मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे एक लाख १७ हजार डोसची मागणी केली.

Only four thousand 800 doses left | फक्त चार हजार 800 डोस शिल्लक

फक्त चार हजार 800 डोस शिल्लक

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात लसटंचाई : सर्वच लसीकरण केंद्र बंद ठेवाव्या लागणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांकडून आता मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, गुरूवारी जिल्ह्यात केवळ चार हजार ८०० डोस शिल्लक आहेत. केंद्र सरकारकडून लस उपलब्ध झाले नाही तर शुक्रवारपासून लसीकरण बंद ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येणार आहे.
आरोग्यसेवक, कोरोना योद्धा, ४५ वर्षांवरील सर्व व ६० वर्षांवरील नागरिकांचे वेगाने लसीकरण सुरू झाले. लस घेण्यात अडचणी येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ९१ केंद्र तयार केले. चंद्रपूर महानगर पालिका आरोग्य विभागाने १४ केंद्रांवरून लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली. मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे एक लाख १७ हजार डोसची मागणी केली. मात्र, जिल्ह्यातील सर्व केंद्रांसाठी कोविशिल्डचे केवळ ३५ हजार ४० हजार डोस मिळाले. त्यामुळे डोस वितरण करताना प्रशासनाची दमछाक झाली. लस घेण्यासाठी आता नागरिकांकडून प्रतिसाद मिळू लागल्याने गुरूवारी जिल्ह्यात केवळ चार हजार ८०० डोस शिल्लक राहिले.  शुक्रवारी डोस उपलब्ध झाले नाही तर जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवाव्या लागणार आहे.

नऊ केंद्रांवरून नागरिक परतले
बल्लारपूर : तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिक प्रतिबंधक लस लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, गुरूवारी तालुक्यातील नऊ केंद्रांवरून नागरिकांना परत जावे लागले. केवळ बामणी येथील आरोग्य केंद्रात  ४० जणांना लस देण्यात आली. शहरातील ग्रामीण रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, रेल्वे इन्स्टिट्युट, नाट्यगृह, बल्लारपूर मेडिकल असोसिएशन, वेकोलि रूग्णालयात लसीकरण केंद्र सुरू झाले. गुरूवारी सकाळी नागरिक केंद्रात गेले असता लस उपलब्ध नसल्याचा पलक दिसला. बामणी कोठारी, विसापूर येथेही लसीकरण झाले नाही.

कर्तव्यात हयगय केल्यास कारवाई
कोरोना प्रतिबंधक औषधसाठा, मनुष्यबळ, अन्य सुविधांसाठी तात्काळ मागणी केल्यास जिल्हा प्रशासनाद्वारे पूर्तता केल्या जाईल. मात्र, कर्तव्यात कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन बेड, प्रतिबंधित क्षेत्र, ब्रेक द चेनअंतर्गत सूचनांचे पालन, आरटीपीसीआर चाचण्या व लसीकरणाबाबतही                    संबंधितांना निर्देश दिले.

भद्रावती,  राजुरातही तुटवडा
भद्रावती, ब्रह्मपुरी, राजुरा तालुक्यात काहींनी को-विन अ‍ॅपवर तर बऱ्याच जणांनी ऑफलाईन नोंदणी केली. मात्र, पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने परत जावे लागल्याची माहिती आहे.

 

Web Title: Only four thousand 800 doses left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.