एक लाख नऊ हजार ज्येष्ठांची दुसऱ्या डोससाठी ताटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 05:00 AM2021-05-13T05:00:00+5:302021-05-13T05:00:37+5:30

जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर ४०० ते ५०० लसी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. दरम्यान, कोरोना संसर्ग वाढल्याने नागरिक जागृत झाले.  आरोग्य विभागानेही लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी यंत्रणा कामी लावली. याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या मानसिकेतत दिसून आला. 

One lakh nine thousand seniors are waiting for the second dose | एक लाख नऊ हजार ज्येष्ठांची दुसऱ्या डोससाठी ताटकळ

एक लाख नऊ हजार ज्येष्ठांची दुसऱ्या डोससाठी ताटकळ

Next
ठळक मुद्देचिंता वाढली : ३९ हजार ३२३ सहव्याधी नागरिकही हतबल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा व चंद्रपूर मनपा आरोग्य विभागाने केंद्रांची संख्या वाढविली. नियोजनाच्या प्रत्येकच टप्प्यावर यंत्रणा सज्ज आहे. मात्र, केंद्र व राज्य पातळीवरील लस पुरवठ्याच्या अडचणी सुटल्या नाहीत. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्या जिल्ह्यातील एक लाख नऊ हजार १०३ ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या डोससाठी ताटकळत राहावे लागत आहे. शिवाय, पहिल्या डोसचा कालावधी पूर्ण झाल्याने ३९ हजार ३२३ सहव्याधी नागरिकांचीही चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर ४०० ते ५०० लसी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. दरम्यान, कोरोना संसर्ग वाढल्याने नागरिक जागृत झाले.  आरोग्य विभागानेही लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी यंत्रणा कामी लावली. याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या मानसिकेतत दिसून आला. 
आता शेकडो नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करीत आहेत. लस घेण्यास वाटेल ते दिव्य सहन करताना दिसतात. गुरुवारी जिल्ह्यात १०४ केंद्रावर लसीकरण होणार आहे. त्यासाठी आरोग्य पथक तयार करण्यात आले. नागरिक लस घेण्यासाठी केंद्रात गर्दी करू शकतात.

हेल्थ केअर,  फंटलाइन वर्करची उद्दिष्टपूर्ती  
जिल्ह्यात १९ हजार ८१४ हेल्थ केअर कर्मचाऱ्यांनी पहिला डोस तर १२ हजार ६६४ जणांनी दुसरा डोस घेतला. आता दुसरा डोस घेणारे सात हजार १५० शिल्लक आहेत. २२ हजार ३१७ फंटलाइन वर्कर पहिला व नऊ हजार १२५ जणांनी दुसरा डोस घेतला. १३ हजार १९२ फंटलाइन वर्कर डोस घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. डोस उपलब्ध झाल्यास दोन्ही प्राधान्य गटाची लवकरच उद्दिष्टपूर्ती होऊ शकते. मात्र, सामान्य नागरिकांना ताटकळत राहावे लागणार आहे.

आरोग्य यंत्रणा सज्ज; आज लसीकरणासाठी गर्दी उसळणार
लसीकरणासाठी प्राधान्य गटानुसार आरोग्य विभागाने तयारी करून ठेवली. परंतु, शासनाकडून जिल्ह्याला लस किती उपलब्ध होतात, यावरच सर्व काही अवलंबून आहे. पुरेशा लसीच मिळत नसल्याने आरोग्य विभागाच्या वाढीव केंद्रांना सध्या तरी अर्थच उरला नाही. या लस तुटवड्यात पहिला डोस घेऊन कालावधी पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची मात्र ताटकळ सुरू आहे. गुरुवारी जिल्ह्यात लसीकरण होणार असल्याने पात्र नागरिकांची प्रचंड गर्दी होणार आहे. चंद्रपूर मनपा प्रशासनाने शहरात १६ केंद्र लसीकरणासाठी सज्ज ठेवले.

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटात १७ हजार ९०४ जणांचे लसीकरण 
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत दोन लाख ७४ हजार ९९७ जणांनी लस घेतली. त्यामध्ये १९ ते ४४ वयोगटातील १७ हजार ९०४ जणांचा समावेश आहे. यातही  दहा हजार ८७ कोविशिल्ड, तर सात हजार ८१७ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली. लस उपलब्ध झाल्यास संख्या पुन्हा वाढणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

 

Web Title: One lakh nine thousand seniors are waiting for the second dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.