राजुरा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 01:58 PM2019-12-25T13:58:11+5:302019-12-25T14:00:21+5:30

आज ही एकाचा बळी गेला यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून वाघाला ठार मारण्याची मागणी केली आहे.

One killed in tiger attack in rajura forest area | राजुरा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

राजुरा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

Next
ठळक मुद्देआज पुन्हा घटना घडल्यामुळे नागरिकांत संताप वाढून संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मागील महिन्यात मूर्ती येथील श्रीहरी साळवे यांचेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते.

चंद्रपूर - आज दुपारच्या सुमारास राजुरा वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 155 मध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात राजुरा येथील इंदिरा नगर वार्डातील मंगेश पैकन कोडापे जागीच ठार झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती होताच नागरिकांसह वन कर्मचारी घटना स्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, अलीकडे तालुक्यात वाघाचे सतत हल्ले होत आहे. आज ही एकाचा बळी गेला यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून वाघाला ठार मारण्याची मागणी केली आहे.

मागील महिन्यात मूर्ती येथील श्रीहरी साळवे यांचेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते. शाई वाळते ना वाळतेच चिचबोली शिवारात आठवळ्यात वाघाने हल्ला करून दोघांना जखमी केले होते. यामुळे परिस्थिती लक्षात घेता या  महिन्यातील जोगापूर देवस्थान यात्रा महोत्सव बंद करण्यात आला आणि गट तयार करून वन कर्मचारीचे रात्र दिवस गस्त करीत आहेत परन्तु वाघाची संख्या जास्त असल्याने अपुरे मनुष्य बळामुळे नियंत्रण करणे आव्हान ठरत आहे. त्यातच आज पुन्हा घटना घडल्यामुळे नागरिकांत संताप वाढून संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: One killed in tiger attack in rajura forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.