हानीकारक रेल्वे मालधक्क्याविरोधात राष्ट्रवादीचे मूलमध्ये ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 11:09 PM2022-09-29T23:09:01+5:302022-09-29T23:09:42+5:30

आंदोलनादरम्यान प्रदेशाध्यक्ष  मेहबूबभाई शेख यांनी केंद्र सरकारच्या आशीर्वादानेच मूल येथे रेल्वे मालधक्का होत असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. मालधक्का होऊ नये, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माहिती देण्यात येईल व मूल शहराला न्याय मिळवून देण्याकरिता सदैव प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले.

NCP's agitation against harmful rail freight strike in Mool | हानीकारक रेल्वे मालधक्क्याविरोधात राष्ट्रवादीचे मूलमध्ये ठिय्या आंदोलन

हानीकारक रेल्वे मालधक्क्याविरोधात राष्ट्रवादीचे मूलमध्ये ठिय्या आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शहरात होत असलेल्या रेल्वे मालधक्क्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते सुमीत समर्थ यांच्या नेतृत्वात गांधी चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. नायब तहसीलदार पवार यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनादरम्यान प्रदेशाध्यक्ष  मेहबूबभाई शेख यांनी केंद्र सरकारच्या आशीर्वादानेच मूल येथे रेल्वे मालधक्का होत असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. मालधक्का होऊ नये, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माहिती देण्यात येईल व मूल शहराला न्याय मिळवून देण्याकरिता सदैव प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी युवक  काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर,  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किसन वासाडे, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, तालुका महिला अध्यक्ष नीता गेडाम, शहर महिला अध्यक्ष अर्चना चावरे, युवक तालुकाध्यक्ष समीर अल्लूरवार, महेश जेंगठे, बंडू साकलवार, अनिकेत मारकवार,  ज्ञानेश्वर वाघमारे, आदी उपस्थित होते.

Web Title: NCP's agitation against harmful rail freight strike in Mool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.