शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:29 AM2021-05-09T04:29:34+5:302021-05-09T04:29:34+5:30

वार्डनिहाय लसीकरण केंद्र द्यावे चंद्रपूर : कोरोना संकट वाढत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून लस घेणे होय, परंतु लसीकणासाठी ...

Government offices should be cleaned | शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी

शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी

Next

वार्डनिहाय लसीकरण केंद्र द्यावे

चंद्रपूर : कोरोना संकट वाढत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून लस घेणे होय, परंतु लसीकणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. त्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात लसीकरण केंद्र निर्माण करावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याने गर्दी वाढणार आहे. त्यामुळे केंद्र वाढविणे गरजेचे आहे.

बेरोजगारांमध्ये पुन्हा नैराश्य

चंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहे. लॉकडाऊनने आता पुन्हा नोकरभरतीवर निर्बंध आले असल्याने तरुणांत नैराश्य निर्माण झाले आहे. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.

लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्या

चंद्रपूर : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते. मात्र, या योजनेचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेभोवती चकरा माराव्या लागतात. तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

धोकादायक पुलाला कठडे लावा

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षण कठडे तुटले असून, काही चोरीलाही गेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी होत आहे.

जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला

चंद्रपूर : सध्या जीवनावश्यक वस्तुंसह इतर सर्वच वस्तुंचे दर गगणाला भिडले आहे. तेलाचे भाव तर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ८० ते ९० रुपयांना मिळणारे तेल पॉकेट आता १४५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडत आहे. अन्नदाता बळीराजाच्या शेतमालाला मात्र आजही भाव जैसे थे असल्याची स्थिती दिसून येत आहे. बळीराजा पुरता हतबल झालेला दिसत आहे. आता तर आणखी पेट्रोलच्या दरातही वाढ केली आहे.

क्रीडा संकुलाचे बांधकाम त्वरित करा

चंद्रपूर : येथील क्रीडा संकूलाची दुरुस्ती केली जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्यामुळे क्रीडा प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाचे काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

कर्मचारी थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत

चंद्रपूर : मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी केली आहे. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहावा वेतन आयोग पाच वर्षे उशिराने लागू करण्यात आला. दरम्यान, या कालखंडातील थकबाकी कामगारांना अद्याप देण्यात आली नाही.

Web Title: Government offices should be cleaned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.