बनावट स्वाक्षरी करणारा सूत्रधार फरार, अटकेसाठी आठ पोलिसांचे पथक गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 11:54 AM2021-09-17T11:54:54+5:302021-09-17T11:58:18+5:30

जिल्हा परिषदेत नोकरी देण्याच्या नावावर युवकांना फसविल्याची तक्रार आल्यानंतर गुरुवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गुरुवारी याबाबत गुन्हा दाखल होताच बल्लारपुरातील मुख्य सूत्रधार आरोपी ब्रिजेशकुमार बैधनाथ झा हा फरार झाला.

Fugitive fraud absconding, squad of eight policemen for arrest | बनावट स्वाक्षरी करणारा सूत्रधार फरार, अटकेसाठी आठ पोलिसांचे पथक गठीत

बनावट स्वाक्षरी करणारा सूत्रधार फरार, अटकेसाठी आठ पोलिसांचे पथक गठीत

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषद प्रकरण : परराज्यात पथक जाण्याची शक्यता

चंद्रपूर : जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याच्या नावावर देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संगणीकृत स्वाक्षरीने बनावट आदेश तयार करून अनेक बेरोजगारांना लाखोंनी लुटल्याचे प्रकरण समोर आले होते. गुरुवारी याबाबत गुन्हा दाखल होताच बल्लारपुरातील मुख्य सूत्रधार आरोपी ब्रिजेशकुमार बैधनाथ झा हा फरार झाला. दरम्यान, रामनगर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी ८ जणांचे पथक गठीत केले. सदर आराेपी परप्रांतात पळाल्याची शक्यता आहे. पोलिसांकडून त्यादृष्टीने तपासाची दिशा ठरल्याची माहिती आहे.

चंद्रपुरातील सुरजनाथ कोडापे आणि राजुरा येथील नितीन सदाशिव घोरपडे यांनी बनावट स्वाक्षरीने अनेकांना लाखोेंनी गंडविल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे केल्यानंतर प्रशासनानेही कागदपत्रांसह तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बल्लारपुरातील सरदार पटेल वॉर्ड, सास्ती रोड येथील आरोपी ब्रिजेशकुमार झा याच्याविरुद्ध भादंवि ४६५, ४६८, ४७९, ४२० अन्वये गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्याचे समजले. वरिष्ठांच्या आदेशानुसार रामनगर पाेलिसांनी ८ जणांचे विशेष पथक तयार केले. पथकाद्वारे आरोपीचा शाेध सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ सहायक व परिचरपदांची भरती नसताना आराेपीने बनावट जाहिरातीच्या आधारावर लाखोंची रक्कम घेऊन नोकरीसाठी पात्र ठरविले आणि तसा आदेशही त्यांना दिला होता. या युवकांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांना आदेश दाखविल्यानंतर हे बनावट प्रकरण उघडकीस आले.

जिल्हा परिषदेत नोकरी देण्याच्या नावावर युवकांना फसविल्याची तक्रार आल्यानंतर गुरुवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आरोपीच्या अटकेसाठी आठ जणांचे एक विशेष पथक गठीत करण्यात आले आहे.

- विनोद बुरले, पोलीस उपनिरीक्षक रामनगर, चंद्रपूर

नोकरीच्या फसव्या आमिषाला बळी पडू नका - 

नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव व बनावट स्वाक्षरी वापरल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सरकारी नोकरी लावून देतो, अशा स्वरूपाच्या कोणत्याही फसव्या आमिषाला बळी पडू नये. प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी केले आहे.

- सीईओ डॉ. सेठी

Web Title: Fugitive fraud absconding, squad of eight policemen for arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.