साडेचार हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:00 AM2020-01-23T06:00:00+5:302020-01-23T06:00:23+5:30

महाविकास आघाडी सरकारने नुकतीच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना नावाने कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, ३१ मार्च २०१९ या तारखेला ज्या शेतकºयांचे कर्ज थकीत आहे अशाच शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ देणार आहे. तालुक्यात पात्र झालेल्या ४ हजार २७७ शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभही मिळणार आहे.

Four and a half thousand farmers are deprived of debt waiver | साडेचार हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

साडेचार हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये नाराजी : १५ कोटी १९ लाख ७० थकीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : १ एप्रिल २०१९ पासून पीक कर्जाची उचल केलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. तालुक्यात विविध कार्यकारी सोसायटीमार्फत कर्ज घेतलेल्या अशा शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ५१५ असून राष्ट्रीयीकृत बँकांतून कर्ज घेतलेले शेतकरी वेगळेच असल्याची माहिती पुढे आली आहे.
महाविकास आघाडी सरकारने नुकतीच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना नावाने कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, ३१ मार्च २०१९ या तारखेला ज्या शेतकºयांचे कर्ज थकीत आहे अशाच शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ देणार आहे. तालुक्यात पात्र झालेल्या ४ हजार २७७ शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभही मिळणार आहे. मात्र याच तालुक्यात १ एप्रिल २०१९ पासून समोर पीककर्ज घेतलेले ४ हजार ५१५ शेतकरी आहेत. शासनाने अशा शेतकºयांसाठी काही निर्णय घेतला नाही कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. नव्हे याच एका पिकावर या तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. तालुक्यात धानाचे हे पीक नोव्हेंबर - डिसेंबर या महिन्यात हातात येते. जानेवारी - फेब्रुवारी या महिन्यात शेतकरी धानाची विक्री करतात. जुनी देणी पूर्ण करतात. पुन्हा नवीन हंगामासाठी एप्रिल महिन्यात नवीन कर्जाची उचल करतात. अशा पीक कर्जावर व्याज बसू नये म्हणून मार्च महिन्यात जुन्या कर्जाची परतफेड करून एप्रिल महिन्यात नवीन कर्जाची उचल केलेल्या शेतकºयांची संख्या तालुक्यात ४ हजार ५१५ आहे. शेतकºयांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम १५ कोटी १९ लाख ७० हजार असल्याची माहिती आहे. उचल केलेल्या कर्जाची नियमित परतफेड करूनही या शेतकºयांवर कर्जमाफीपासून वंचित राहावे लागत असल्याने या शेतकºयांमध्ये चांगलाच असंतोष धुमसत आहे. थकित शेतकºयांनाच कर्जमाफीचा लाभ का मिळते, अशी खंत शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Four and a half thousand farmers are deprived of debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.