forget fighting for water | Corona virus in Chandrapur; विसरा आता नळावरची भांडणे; गुण्यागोविंदाने पाणी भरा

Corona virus in Chandrapur; विसरा आता नळावरची भांडणे; गुण्यागोविंदाने पाणी भरा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोरोना व्हायरसने जनजीवन एकीकडे दहशतीत असले तरी अनिवार्य केलेल्या संचारबंदीमुळे अनेक चांगल्या घटना व परिवर्तन घडून येताना दिसते आहे. पाण्यासाठी नळावरची भांडणे हा एक अजरामर विषय. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातल्या निंबाळा ग्रामपंचायतीने हा विषय आपल्या चतुराईने निकालात काढला आहे.
गावच्या पाणवठ्यावर त्यांनी चुन्याने चौकोन आखून त्या चौकोनातच स्त्रियांना उभे राहण्याचे बंधन घातलेआहे. त्यामुळे माझा नंबर आधी होता, तुझा नंतर होता अशी भांडणाची वेळच तेथे त्यांनी येऊ न देण्याचे ठरविले आहे. गावातील महिलांनाही कोरोनाबाबत पुरेशी माहिती आता झाल्याने त्यांनी, आपली भांडणे कोरोना संपल्यावर करूयात असे कदाचित म्हणत, शांततेने पाणी भरायला सुरुवात केली आहे.

Web Title: forget fighting for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.