कोरोनाविरूद्धची लढाई अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:00 AM2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:37+5:30

नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. ते सर्व नागरिक तपासणीअंती निगेटीव्ह निघाले आहेत. सोबतच त्यांना दिल्ली सोडून १४ दिवसांवर कालावधी झाला आहे. मात्र, त्यांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन केल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी यावेळी दिली.

The final phase of the war against Corona | कोरोनाविरूद्धची लढाई अंतिम टप्प्यात

कोरोनाविरूद्धची लढाई अंतिम टप्प्यात

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची माहिती : मशिदीतून ताब्यात घेतलेल्या ११ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या लढाईमध्ये अंतिम टप्प्यात आपण आलो असून नागरिकांनी घराबाहेर पडून जीव धोक्यात घालू नये. जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढायची असून त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. ते सर्व नागरिक तपासणीअंती निगेटीव्ह निघाले आहेत. सोबतच त्यांना दिल्ली सोडून १४ दिवसांवर कालावधी झाला आहे. मात्र, त्यांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन केल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी यावेळी दिली. घरातील सुदृढ असणाऱ्या एकाच व्यक्तीला पुढील आठवडाभर एकदाच बाहेर पडावे लागेल असे नियोजन करावे व सामाजिक अंतर राखावे. जिल्ह्यामध्ये कोणी येणार नाही याचा कडेकोट बंदोबस्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात राबविला जात आहे. चंद्रपूरमध्ये जे कुणी अडकून पडले असेल किंवा ज्यांना बाहेर जायचे असेल त्यांनीही पुढील १४ तारखेपर्यंत संयम पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

मोफत धान्य वितरणाला सुरूवात
अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाच्या शिधापत्रिकाधारकांना नियमित मिळणाºया धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत ५ किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेताना गडबड होणार नाही याची काळजी घ्यावी. शुक्रवारी योजनेचा शुभारंभ चंद्र्रपूर शहरातून करण्यात आला आहे. रेशनकार्ड वर मिळणाºया अन्य अन्नधान्यासाठी २ व ३ रुपये दराने खरेदी करता येणार आहे. मात्र तांदूळ हा मोफत मिळत आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

विदेशातील २८ जणांवर अद्याप निगराणी
जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत विदेशात जाऊन आलेल्या २०४ प्रवाशांची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यापैकी १४ दिवसांच्या निगराणीत असणाºया प्रवाशांची संख्या २८ तर १४ दिवसांची तपासणी करण्यात आलेल्या विदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या १७६ आहे.

१४ एप्रिलपर्यंत चंद्रपूर अप-डाऊन बंद करण्याचे निर्देश
खबरदारी म्हणून शनिवारपासून चंद्रपुरातून एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही आणि बाहेरून एकही व्यक्ती चंद्रपूर शहरात येणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी दिले. लॉकडाउन लागू झाल्यानंतर नागरिकांना जीवनाश्यक वस्तुंसाठी अडचणी येऊ नये, याकरिता प्रशासनाने उपाययोजना केल्या. त्यामुळे विनाकारण बाहेर निघण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

५ हजार २९८ नागरिक निवारा केंद्रात
जिल्ह्यात ५ हजारपेक्षा अधिक नागरिक शेल्टर होममध्ये आश्रयाला आहेत. या सर्र्वांना व्यवस्थित खानपान मिळावे व कोणत्याही तक्रार राहू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. आवश्यकतेनुसार पुन्हा शेल्टर होम वाढविण्यात येणार आहेत.

यंग चांदा ब्रिगेडकडून निरंतर भोजनसेवा
चंद्रपूर : लॉकडाउन लागू झाल्याने शेकडो कामगारांना संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून १० हजार गरजूंपर्यत भोजनाचा डब्बा पोहचवला जात आहे. यात सामाजिक संस्थाही सक्रिय झाल्या आहेत.
गणेशपुरातील मजूर अडकले
देवाडा बु. : पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बू तसेच गणेशपूर येथील मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी ते मिरची तोडण्याकरिता तेलंगणा राज्यात गेले होते. मात्र, लॉकडाउनमुळे स्वगावी येऊ शकले नाहीत. त्यामुळे भोजन व निवासाच्या दृष्टीने बेहाल सुरू असल्याची माहिती त्यांनी कुटुंबीयांनी दिली.

२७ मजुरांना रैन बसेरात आश्रय
सावली : तेलंगणा राज्यातून रोजगारासाठी जाऊन परत येणाºया २७ मजुरांना येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या रैन बसेरात आश्रय देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सूरमवार व लोकसहभागातून भोजनाची व्यवस्था केली जात आहे. २७ पैकी १४ गोंदिया, १० गडचिरोली व ३ मजूर चंद्र्रपूर जिल्ह्यातील आहे. सर्व मजुरांना ग्रामीण रूग्णालयात तपासणीकरिता नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधीक्षक एक तास उशिरा आल्याने मजुरांना ताटकळत राहावे लागले.
व्यावसायिकावर कारवाई
भद्रावती : संचारबंदीच्या काळात शासनाचे नियमाचे पालन न करता दुकान सुरू ठेवल्याने लोणारा येथील व्यावसायिकाविरूद्ध गुरुवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एकनाथ नांदे असे आरोपीचे नाव आहे. नागरिकांनी घराबाहेर निघू नये, असे आवाहन पोलिसांनी केले.

धानोरकर दाम्पत्याकडून ३ हजार नागरिकांना देणार भोजन
चंद्र्रपूर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकसभा क्षेत्रातील ३ हजार गरजूंना खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. शुक्रवारी वरोरा तालुक्यातून सुरूवात झाली. शनिवारपासून लोकसभा क्षेत्रात आवश्यक सर्व ठिकाणी भोजन वितरित होणार आहे.

Web Title: The final phase of the war against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.