आर्थिक संकटामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी करताहेत बोअरवेलचे हाताने खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 02:44 PM2020-05-21T14:44:20+5:302020-05-21T14:51:24+5:30

मशीनद्वारे बोअरवेलचे खोदकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. ही बाब शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकरी नदी लगतच्या शेतांमध्ये हाताद्वारे बोअरवेलचे खोदकाम करीत आहेत.

Due to financial crisis, farmers in Chandrapur district are digging borewells by hand | आर्थिक संकटामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी करताहेत बोअरवेलचे हाताने खोदकाम

आर्थिक संकटामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी करताहेत बोअरवेलचे हाताने खोदकाम

googlenewsNext
ठळक मुद्देआरमोरी तालुक्यातील अनेक शेतकरी वळले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मशीनद्वारे बोअरवेलचे खोदकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. ही बाब शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकरी नदी लगतच्या शेतांमध्ये हाताद्वारे बोअरवेलचे खोदकाम करीत आहेत. या माध्यमातून कमी खर्चात शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था होत आहे.
नदी किनाऱ्यालगतची जागा ओलसर राहत असल्याने हाताद्वारे बोअरवेलचे खोदकाम करणे सोयीचे होते. एक विशिष्ट लोखंडी दांडा पकडून तीन ते चार व्यक्ती हाताद्वारे बोअरवेलचे खोदकाम करतात. जवळपास ६० ते ७० फुट खोल खोदकाम केले जाते. त्यामुळे आवश्यक प्रमाणात पाणी लागते. आरमोरी तालुक्यातून खोब्रागडी, गाढवी, वैैलोचना तसेच सीमेवरून वैैनगंगा नदी वाहते. या नदीलगत अनेक शेतकरी भाजीपाला, उन्हाळी धान, मका, टरबूज, खरबूज, रताळी यासह विविध पीके घेतात. काही शेतकऱ्यांनी मशीनद्वारे बोअरवेलचे खोदकाम केले आहे. तर काही जणांकडे विहिरी आहेत. सोयीनुसार अनेकांनी नदीपात्रात खड्डा खोदून मोटारपंपद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. परंतु नदीपासून दूर असलेल्या शेतकºयांकडे ही सोय नसल्याने अनेकांनी हाताद्वारे मजुरांमार्फत बोअर मारल्याने त्यांच्याही शेतात पाण्याची सोय झाली आहे.

Web Title: Due to financial crisis, farmers in Chandrapur district are digging borewells by hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी