डॉ. बाबासाहेबांची शिकवण अंगीकारणे हीच आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 05:00 AM2021-04-15T05:00:00+5:302021-04-15T05:00:36+5:30

ज्ञानाअभावी व्‍यक्‍ती आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्‍यक्‍ती व समूहाला शिक्षण नाकारणे म्‍हणजे माणूस म्‍हणून त्‍याचे अस्तित्‍व नाकारून त्‍याची क्षमता मारून टाकणे होय, अशी बाबासाहेबांची शिक्षणविषयक धारणा होती. त्‍यांची शिकवण अंगीकारणे हीच त्‍यांच्‍या जयंतीदिनी  आदरांजली ठरेल, असे मत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Dr. Adopting the teachings of Babasaheb is the only honor | डॉ. बाबासाहेबांची शिकवण अंगीकारणे हीच आदरांजली

डॉ. बाबासाहेबांची शिकवण अंगीकारणे हीच आदरांजली

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : भाजप चंद्रपूर महानगरतर्फे जयंती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : समता, स्‍वातंत्र्य आणि बंधुभाव ही मानवी मुल्‍ये स्वीकारलेला स्‍वाभिमानी आधुनिक समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करावयाचा होता. बाबासाहेबांच्‍या शैक्षणिक व सामाजिक चळवळीचा हाच खरा मुलाधार होता. ज्ञानाअभावी व्‍यक्‍ती आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्‍यक्‍ती व समूहाला शिक्षण नाकारणे म्‍हणजे माणूस म्‍हणून त्‍याचे अस्तित्‍व नाकारून त्‍याची क्षमता मारून टाकणे होय, अशी बाबासाहेबांची शिक्षणविषयक धारणा होती. त्‍यांची शिकवण अंगीकारणे हीच त्‍यांच्‍या जयंतीदिनी  आदरांजली ठरेल, असे मत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विश्‍वरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती दिनानिमीत्‍त भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेला माल्‍यार्पण करून त्‍यांना आदरांजली वाहण्‍यात आली.  यावेळी ते बोलत होते.
यावेळी महानगर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, स्‍थायी समिती सभापती रवी आसवाणी, प्रकाश धारणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रिजभुषण पाझारे, विशाल निंबाळकर, रवींद्र गुरनुले, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, रामकुमार आकापेल्‍लीवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार यांनीही अभिवादन केले. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

Web Title: Dr. Adopting the teachings of Babasaheb is the only honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.