कुत्र्याला तलावात फेकून व्हिडिओ काढणे पडले ‘त्याला’ महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:19 PM2020-01-13T13:19:35+5:302020-01-13T13:20:05+5:30

चंद्रपूर शहरातील रामाला तलावजवळ प्रकाश चंदनगीरीवार या युवकाने बाजूला झोपलेल्या कुत्र्याचे शेपूट पकडून त्याला रामाळा तलावात फेकले.

The dog had to be thrown into the pond by youth | कुत्र्याला तलावात फेकून व्हिडिओ काढणे पडले ‘त्याला’ महागात

कुत्र्याला तलावात फेकून व्हिडिओ काढणे पडले ‘त्याला’ महागात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक व्हिडिओ चंद्रपूर शहरात प्रसिध्द झाला. मात्र व्हिडिओ प्रसिद्ध होताच संबधीत तरुणाला चांगलेच महागात पडले असून पोलिसांनी त्याला अटक केली. एवढेच नाही तर त्याच्याकडून माफीनामाही लिहून घेतला.
चंद्रपूर शहरातील रामाला तलावजवळ प्रकाश चंदनगीरीवार या युवकाने बाजूला झोपलेल्या कुत्र्याचे शेपूट पकडून त्याला रामाळा तलावात फेकले. या संपूर्ण प्रकारचा त्याने व्हिडीओ बनवत तो टिकटोकवर अपलोड केला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. आपल्या मनोरंजनासाठी एका मुक्या प्राण्याला त्रास दिला म्हणून त्याला चांगलेच ट्रोल केले गेले. शहरातील मुक्या जनावरांवर प्रेम व त्यांचं संगोपन करणारी 'प्यार' या सामाजिक संस्थेने त्या युवकाची शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. लागलीच पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. प्रकाश चांदनगिरीवर असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याच्याकडून एक माफीनामा लिहून घेतला असून यामध्ये यानंतर अशी चूक करणार नसल्याचे त्याने लिहून दिले आहे.

Web Title: The dog had to be thrown into the pond by youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.