चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमकर यांच्या बदलीच्या निषेधात डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 02:45 PM2020-08-11T14:45:41+5:302020-08-11T14:46:33+5:30

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या बदलीच्या विरोधात जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात मंगळवारी  दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले.

District Collector of Chandrapur Dr. Blindfolded agitation in protest of Kunal Khemkar's transfer | चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमकर यांच्या बदलीच्या निषेधात डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमकर यांच्या बदलीच्या निषेधात डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन

Next
ठळक मुद्देउद्यापासून सर्वपक्षीय आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सोमवारी अचानक चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची बदली करण्यात आली. शासनाने केलेल्या या बदलीच्या जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात मंगळवारी  दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी हे पेशाने डॉक्टर आहेत. मागील चार महिन्यापासून कोविड १९ आपत्तीचे अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करीत आहेत. कोविडची आपत्ती आल्यानंतर तीन महिन्यापर्यंत चंद्रपुरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला नाही यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या नियोजनाचं व त्यांच्या नेतृत्वात चतुर्थश्रेणी कर्मचारी ते अधिकारी व कंत्राटी कामगार या सर्वांच्या टीमने अतिशय चांगले काम केलेले आहे. जिल्हाधिकारी यांना चंद्रपुरात केवळ दोन वर्ष झाले. प्रामाणिक व होतकरू अधिकारी असलेले डॉ. खेमनार यांनी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक सामान्य माणसाची कैफियत ऐकून घेणे, नियमात बसत असेल तर तातडीने न्याय देणे ही त्यांची पद्धत अनेकांना पसंत होती.

Web Title: District Collector of Chandrapur Dr. Blindfolded agitation in protest of Kunal Khemkar's transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.