सर्दी, खोकल्याच्या औषधांची मागणी पुन्हा वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:00 AM2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:00:49+5:30

शहरात सध्या सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या बरीच वाढली आहे. कोणी वातावरणाचा बदल म्हणत आहे, तर कोणी नेहमीच सर्दी, खोकला म्हणून दुखणे अंगावर काढत आहे. ताप असेल तर कोरोना संसर्ग असू शकतो. त्यामुळे कोरोना टेस्ट करून घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

Demand for this specialty has grown significantly as a result of recent corporate scandals | सर्दी, खोकल्याच्या औषधांची मागणी पुन्हा वाढली

सर्दी, खोकल्याच्या औषधांची मागणी पुन्हा वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. यामुळे  नागरिक जराही सर्दी, खोकला आणि घसादुखी वाटली तर थेट  मेडिकलमध्ये जाऊन औषधी घेत आहे. परिणामी या दिवसामध्ये सर्दी, खोकल्याच्या औषधीची मागणी झपाट्याने वाढली आहे.
‘कोरोना’च्या रुग्णाला घशाची खवखव, वारंवार शिंक येणे, डोकेदुखी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. ही सर्वसाधारण लक्षणे आहेत. हा त्रास नेहमीचाच आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक त्वरित औषध घेऊन बरे होण्याच्या प्रयत्न करीत आहेत. काही जण तर सर्दी, खोकला होण्यापूवीच मेडिकलमध्ये जाऊन औषध घरी आणून ठेवत आहेत. परिणामी खोकल्याच्या औषधाची झपाट्याने मागणी वाढली आहे. 

शासकीय ओपीडी वाढली
- मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर आता शासकीय रुग्णालयातील ओपीडीमध्ये गर्दी दिसू लागली आहे. 
- कोरोनाच्या संभाव्य भीतीमुळे नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेत असून लवकर औषधोपचार घेऊन बरे होण्यावर भर देत आहे.

...तर करा कोरोना टेस्ट
शहरात सध्या सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या बरीच वाढली आहे. कोणी वातावरणाचा बदल म्हणत आहे, तर कोणी नेहमीच सर्दी, खोकला म्हणून दुखणे अंगावर काढत आहे. ताप असेल तर कोरोना संसर्ग असू शकतो. त्यामुळे कोरोना टेस्ट करून घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

बदललेले वातावरण हेही कारण
मागील काही दिवसात वातावरण सारखे बदलत आहे. कधी ढगाळी वातावरण तर कधी अचानक थंडी वाढत आहे. त्यामुळे आरोग्यावर याचा विपरीत परिणाम पडत आहे. लहान बालकांसह ज्येष्ठांची यामुळे प्रकृती बिघडत आहे.

दहापैकी आठ जण सर्दी-खोकल्याचे

मागील काही दिवसांमध्ये सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहे. दिवसभरातील १० रुग्णांमध्ये सात ते आठ रुग्ण हे सर्दी, खोकल्याचेच येत आहेत. काही जण डाॅक्टरकडे न जाताच मेडिकलमध्ये येऊन सर्दी, खोकल्याचे औषध मागत आहे.
-देवेंद्र हेपट, औषधी दुकानदार

सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे नागरिक सर्दी, खोकला झाला तर त्वरित औषध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या दिवसामध्ये सर्दी, खोकल्याच्या औषधाची मागणी वाढली आहे.
- औषधी दुकानदार

 

Web Title: Demand for this specialty has grown significantly as a result of recent corporate scandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.