अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळचा मृत्यू; चिमूर-वरोरा हायवेवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 03:05 PM2020-05-29T15:05:59+5:302020-05-29T15:06:23+5:30

चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खडसंगी बिटातील चिमूर वरोरा हायवेवर खडसंगी जवळील मुरपार फाट्यालागत अज्ञात वाहनांच्या धडकेत चितळचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाच सहा वाजताच्या दरम्यान घडली.

Deer killed in unidentified vehicle collision; Incident on Chimur-Warora Highway | अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळचा मृत्यू; चिमूर-वरोरा हायवेवरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळचा मृत्यू; चिमूर-वरोरा हायवेवरील घटना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खडसंगी बिटातील चिमूर वरोरा हायवेवर खडसंगी जवळील मुरपार फाट्यालागत अज्ञात वाहनांच्या धडकेत चितळचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाच सहा वाजताच्या दरम्यान घडली.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफ्फर झोन लागत असलेल्या खडसंगी पासुन दीड किमी अंतरावरील मुरपार फाट्या जवळ अनेक जंगली प्राणी ताडोबा बफ्फर क्षेत्र ते मुरपार प्रादेशिक क्षेत्रात ये जा करीत असतात त्यामुळे या जंगलं परिक्षेत्रात वाघ, बिबट, चितळ, हरीण, अस्वल, डुक्कर आदी प्राण्यांचा नेहमी वावर असतो. त्यातच आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे जंगलातील ठीकठिकाणी असलेले पाणवठे कोरडे पडले आहेत
उन्हाळ्याच्या दिवसात जंगली प्राणी पाण्याच्या शोधत भटकंती करीत असतात अशीच भटकंती करीत असताना शुक्रवारी सकाळी पाच सहा वाजताच्या सुमारास चिमूर ते वरोरा हायवे वरून रस्ता क्रॉस करीत असताना मुरपार फाट्याजवळ पाण्याच्या व्हॉल्व्ह जवळ अज्ञात वाहनाने चितळला जोरदार धडक मारल्याने चितळचा जागीच मृत्यू झाला
सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे खडसंगी बिटचे वनरक्षक एन डी मडावी, वनरक्षक सी एस चिंचोळकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी बी पी चिवंडे यांच्या नेतृत्वात घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत चितळ खडसंगी येथील विश्राम गृहात आणून पशु वैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा करून अग्नी देऊन जाळण्यात आले.

Web Title: Deer killed in unidentified vehicle collision; Incident on Chimur-Warora Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.