CoronaVirus Live Updates : चंद्रपूर जिल्ह्यात 1160 कोरोनामुक्त, 370 पॉझिटिव्ह तर 26 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 06:54 PM2021-05-18T18:54:52+5:302021-05-18T19:00:30+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 78 हजार 509 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 68 हजार 835 झाली आहे.

CoronaVirus Live Updates: 370 new corona positive and 26 deaths in Chandrapur district | CoronaVirus Live Updates : चंद्रपूर जिल्ह्यात 1160 कोरोनामुक्त, 370 पॉझिटिव्ह तर 26 जणांचा मृत्यू

CoronaVirus Live Updates : चंद्रपूर जिल्ह्यात 1160 कोरोनामुक्त, 370 पॉझिटिव्ह तर 26 जणांचा मृत्यू

Next

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासांत 1160 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 370 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 26 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 78 हजार 509 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 68 हजार 835 झाली आहे. सध्या 8 हजार 373 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 39 हजार 35 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 57 हजार 584 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर वार्ड येथील 70 वर्षीय पुरुष, नेहरू नगर येथील 62 वर्षीय पुरुष, सिव्हिल लाईन परिसरातील 65 वर्षीय पुरुष, पडोली येथील 45 वर्षीय पुरुष, तुकूम परिसरातील 56 वर्षीय महिला, नगीनाबाग येथील 69 वर्षीय महिला, 49 वर्षीय महिला. देवाडा येथील 70 वर्षीय पुरुष, कोकेवाडा येथील 43 वर्षीय पुरुष. किटाळी-शिदूर येथील 61 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 42 वर्षीय महिला.

बल्लारपूर तालुक्यातील 82 वर्षीय महिला, विसापूर येथील 52 वर्षीय महिला. राजुरा तालुक्यातील 55 व 65 वर्षीय महिला. मूल तालुक्यातील 68 व 76 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील 68 व 75  वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील 37 वर्षीय पुरुष. कोरपना तालुक्यातील 23 वर्षीय पुरुष.  चिमूर तालुक्यातील 60 वर्षीय महिला, अडेगाव येथील 60 वर्षीय महिला. नागभीड तालुक्यातील 60 वर्षीय महिला तर वणी येथील 61 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1301 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1204, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 44, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे. आज बाधीत आलेल्या 370  रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 127, चंद्रपूर तालुका 33, बल्लारपूर 27, भद्रावती 06, ब्रम्हपुरी 16, नागभिड 19, सिंदेवाही 12, मूल 25, सावली 16, पोंभूर्णा 07, गोंडपिपरी 19, राजूरा 16, चिमूर 03, वरोरा 21, कोरपना 15, जिवती 03 व इतर ठिकाणच्या 05 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
 

Web Title: CoronaVirus Live Updates: 370 new corona positive and 26 deaths in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.