जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:29+5:30

चंद्रपुरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सुमारास शहरातील दुकाने नेहमीप्रमाणे उघडली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, बंडू नगराळे, प्रवीण गावतुरे, जयदीप खोब्रागडे, अहमद सिद्दीकी, लता साव, रवींद्र उमाटे, अंकुश वाघमारे, शिरीष गोगुलवार, मधू वानखेडे, रामदास चौधरी, अझहर शेख, तनुजा रायपुरे, विद्याधर लाडे, बंडू ठमके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

Composite response to the district bandh | जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

Next
ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध : काही ठिकाणी कडकडीत बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एनआरसी, सीएए, एनपीआर लागू करू नये या व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी, सोबतच केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. याला चंद्रपूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. चंद्रपुरात काही भागात दुकाने कडकडीत बंद होती तर काही ठिकाणी सुरू होती. ग्रामीण भागातील सावली, बल्लारपूर, नागभीड, पोंभूर्णा, शंकरपूर, ब्रह्मपुरी या शहरात मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला. तत्पूर्वी चंद्रपूरसह अनेक शहरात मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
चंद्रपुरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सुमारास शहरातील दुकाने नेहमीप्रमाणे उघडली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, बंडू नगराळे, प्रवीण गावतुरे, जयदीप खोब्रागडे, अहमद सिद्दीकी, लता साव, रवींद्र उमाटे, अंकुश वाघमारे, शिरीष गोगुलवार, मधू वानखेडे, रामदास चौधरी, अझहर शेख, तनुजा रायपुरे, विद्याधर लाडे, बंडू ठमके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यानंतर महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, गांधी चौक, गिरणार चौकातील दुकाने बंद ठेवली. दुपारी राजू झोडे सहभागी झाले. पोलीस बंदोबस्तात मोर्चा प्रियदर्शिनी चौकात गेल्यानंतर मोर्चेकऱ्यांना तिथेच बसवून ठेवले.

मूलमध्ये कडकडीत
मूल : वंचित बहुजन आघाडी, आंबेडकर समाज व हज टीपू सुल्तान फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवारी मूल बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदमध्ये मूल येथील व्यापारी बांधवानी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून मूल बंदला सहकार्य केले. या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण प्रतिष्ठाने बंद होती. यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते शम्मी डोर्लीकर, विनोद निमगडे, पुरूशोत्तम साखरे, सुजित खोब्रागडे, बालु दुधे, वंचित बहुजन आघाडीचे संजय गेडाम, मधुकर उराडे, हज टीपू सुल्तान फाऊंडेशनचे आरीफ खान, बशीर खान, रशीद शेख, नईम शेख, आसिफ पठाण यांनी सहकार्य केले.

पोंभुर्ण्यात १०० टक्के प्रतिसाद
घोसरी : पोंभुर्णा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोंभूर्णात बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला येथील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. यासोबतच शाळा-महाविद्यालयही बंद ठेवण्यात आले होते. आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातून रॅलीही काढण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दादु ढोले, तालुका अध्यक्ष चंद्रहास उराडे, लुलाराम खोब्रागडे, रघुनाथ उराडे, जयपाल उराडे, रवी तेलसे, विजय दुर्गे, श्यामकुमार गेडाम, राजू खोब्रागडे, अविनाश वाळके, आशिष वनकर, गोपाळा वाकडे, रुपेश निमसरकार, अजय उराडे, आडकु दुर्गे, मायाताई मून, रिना उराडे, शालिनी खोब्रागडे, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

नागभीडमध्ये मोर्चा
नागभीड : बहुजन वंचित आघाडी नागभीड तालुकाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. अरविंद सांदेकर, डॉ. गजभे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची सुरुवात जुना बसस्थानक येथून झाली. संपूर्ण शहरातून फिरत तहसील कार्यालय परिसरात मोर्चा दाखल झाला. यावेळी अरविंद सांदेकर, डॉ. गजभे, श्रीरामे यांनी मार्गदर्शन केले. संचालन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजकुमार मेश्राम यांनी केले. निवेदन देताना एस.एल.खोब्रागडे, गेडाम, खरात, अश्विन मेश्राम यासह बहुसंख्य कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.

बल्लारपुरात कडकडीत
बल्लारपूर : वंचित आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एनआरसी, सीएए व एनपीआर कायदा देशात लागू करू नये म्हणून महाराष्ट्र राज्य बंद करण्याची हाक शुक्रवारी दिली. या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्यात बंद पाळण्यात आला. यावेळी वंचित आघाडीचे राजू झाडे, पवन भगत, नासिर बख्त व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागातील विसापूर व कोठारीत कडकडीत बंद पाळण्यात आला. वंचित आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्ते रस्त्यावर येवून केंद्र सरकार विरोधी घोषणा देत, व्यावसायिकांना प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करीत होते. यावेळी बल्लारपूर शहर, ग्रामीण भागात विसापूर व कोठारी येथे सर्व व्यापारीवर्गाने दुकाने बंद ठेवून सहकार्य केले. शैक्षणिक संस्थांनी शाळा व महाविद्यालय बंद ठेवली होती. देशाची वाटचाल आर्थिक मंदीकडे चालु आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या व उद्योग क्षेत्र डबघाईला येत आहेत. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे देशपातळीवर असंतोष निर्माण झाला आहे ़ परिणामी सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला आहे़ देशातील ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष करून संविधान विरोधी कार्य केंद्र सरकार करीत आहे़, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे़.

ब्रम्हपुरीत काही वेळासाठी दुकाने बंद
ब्रह्मपुरी : बहुजन वंचित आघाडीने शुक्रवारी महाराष्ट्र बंद बंदची हाक दिली होती, या हाकेला प्रतिसाद म्हणून ब्रह्मपुरीत काही वेळासाठी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. शहराच्या मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात डॉ. प्रेमलाल मेश्राम, अ‍ॅड. मनोहर उरकुडे, प्रा. देवेश कांबळे, इक्बाल जसानी, जीवन बागडे प्रशांत डांगे, विलास मैंद, सुखदेव प्रधान यांच्यासह मुस्लीम समाज, विविध सघटकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर मोर्चा बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे चौक, झाशीराणी चौक, संत रविदास चौक, सावरकर चौक, शिवाजी महाराज चौक ते तहसील मैदान या मार्गाने काढण्यात आला.

सावलीत शुकशुकाट
सावली : जिल्हा बंदला सावलीत १०० टक्के प्रतिसाद मिळाला. सावली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडी शाखा सावलीच्या वतीने केलेल्या आवाहनाला येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बंद यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले. तत्पूर्वी शहरातून मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात शहर अध्यक्ष रोशन बोरकर, शहर महासचिव नितीन दुधे, तालुका अध्यक्ष चेतन रामटेके, विलास माहुरकर, महिला तालुका अध्यक्ष उल्काताई गेडाम, वेणुताई बोरकर मनोरमा गेडाम, किरण गेडाम, विना गडकरी, वैशाली गेडाम, राणी मोटघरे, चंद्रभागा गेडाम, अरुणा सोमकुवर, प्रियका गोंगले, उज्ज्वला गोवर्धन, सविता सेमस्कार, रेखा गेडाम, वृंदा दुर्गे, सत्यभामा सहारे, मीनाक्षी वाळके, संजय घडसे, ज्योती मेश्राम, भारती देवगडे आदी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Composite response to the district bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.